Ambadas Danve Letter to Fadanvis : तीन महिन्यात साडेपाच हजार महिला-मुली बेपत्ता ; महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा...

Maharashtra : महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत.
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, AurangabadSarkarnama

Shivsena : महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिध्द झाले आहे. परंतु अलिकडच्या काळात राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका केली आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News, Aurangabad
Vinod Tawade News : भाजप हायकमांडचे विनोद तावडेंना पाठबळ; फडणवीस समर्थकांमध्ये अस्वस्थता!

महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च २०२३ राज्यातून सुमारे ५५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. (Shivsena UT) जानेवारी २०२३ या महिन्यात १६०० मुली तर फेब्रुवारी महिन्यात १८१० तर मार्च महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे.

सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. (Maharashtra) महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते.

अशा राज्यात मुली, महिला सुरक्षित नसतील तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक आहे. या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com