Dattatray Landge 1st in MPSC : Sarkarnama
मराठवाडा

Dattatray Landge 1st in MPSC : बीडचे दत्तात्रय लांडगे 'एमपीएससी'त प्रथम

अनुराधा धावडे

Beed MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१७ मध्ये काही विशिष्ट पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यात बीडच्या जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असणारे दत्तात्रय लांडगे यांनी शिक्षण सेवा गट ब मर्यादित उपशिक्षणाधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अत्यंत संघर्ष आणि खडतर प्रवास करून लांडगे इथपर्यंत पोहोचल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक पाठक यांनी दिली आहे.

सोमवारी (११ सप्टेंबर) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर २०१७ मध्ये झालेल्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल घोषित करण्यात आला. या परीक्षेत धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील दत्तात्रय लांडगे यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. लांडगे हे बीड जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागात विज्ञान पर्यवेक्षक (सहायक योजना अधिकारी) म्हणून काम करतात.

दत्तात्रय लांडगे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण धाराशिव जिल्ह्यात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नेकनूर येथील शासकीय अध्यापक विद्यालयात त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणूनही काम पाहिले. सध्या ते बीडमधील माध्यमिक शिक्षण विभागात सायन्स सुपरवायझर या पदावर कार्यरत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT