Eknath Khadse News : एकनाथ खडसेंचा मतदारसंघ ठरला; रावेरमधून सुने विरोधात मैदानात...

Raver Lok Sabha Constituency : नऊ वेळा काँग्रेस हरली असेल, तर आता राष्ट्रवादीकडे घ्यावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
Eknath Khadse, Raksha Khadse
Eknath Khadse, Raksha KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने रावेर लोकसभा लढविण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसला जागा देण्याचा निर्णय झाल्यास इंडिया आघाडीकडून रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची जळगाव येथे सागर पार्क मैदानावर जाहीर सभा झाली होती, त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एकनाथ खडसे यांनी लोकसभेचे धनुष्यबाण पेलावे,' असे आवाहन केले होते. त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे उमेदवार असतील, असे बोलले जात होते. या मतदारसंघात त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर सासरा विरुद्ध सून अशी लढत होईल,अशीही चर्चा सुरू झाली होती. त्यावर आज एकनाथ खडसेंनी खुलासा केला.

Eknath Khadse, Raksha Khadse
Anil Parab News : जरांगेच्या उपोषणावर अनिल परबांचे प्रश्नचिन्ह : नव्या वादाला तोंड फुटलं; म्हणाले, "मराठवाड्यातील मराठ्यांना..."

एकनाथ खडसे म्हणाले, "पक्षाने आपल्याला जबाबदारी तर ‘इंडिया’च्या माध्यमातून दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहोत. रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक कॉंग्रेसने दहा वेळा लढली आहे. एका लोकसभेत त्यांना विजय मिळाला होता, तोही फक्त तेरा महिन्यांचा कालावधी त्यांना मिळाला हा एकच अपवाद आहे. मात्र, नऊ वेळा या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. नऊ वेळा काँग्रेस हरली असेल तर आता ही जागा ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे घ्यावी, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.

‘इंडिया’आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत काँग्रेसने हा मतदारसंघ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ला रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाली तर आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहोत. मात्र, हा सर्व निर्णय ‘इंडिया’ आघाडीचा एकत्रित होईल. खडसे यांच्या घरात दोन पक्ष आहेत. त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत, तर एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत.

आमच्या घरात दोन पक्ष...

खडसे म्हणाले, "देशात असे कितीतरी उदाहरणे आहेत. ग्वाल्हेरमध्ये तर माधवराव शिंदे यांच्या मातोश्री विजयाराजे शिंदे भारतीय जनता पक्षात होत्या, तर माधवराव शिंदे कॉंग्रेसमध्ये होते. त्यांनी एकमेकाविरुद्ध निवडणुकाही लढविल्या आहेत. त्यामुळे आमच्या घरात दोन पक्ष असले तरी रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाचे काम इमाने इतबारे करीत आहेत, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करीत आहे. त्यामुळे आमच्यात कधी वाद झाले नाहीत आणि तसे होण्याचेही कारण नाही,"

वाद होण्याचा संबंधच नाही...

"रक्षा खडसे यांना त्यांच्या पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती त्या पार पाडतात. मला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली ती मी पार पाडतो. त्यामुळे वाद होण्याचा कोणताही संबंधच नाही," असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Edited By : Mangesh Mahale

Eknath Khadse, Raksha Khadse
Manoj Jarange News : मराठा समाजाने वेळ दिला, आता सरकारची कसोटी; आंदोलन संपण्याचा प्रश्नच नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com