MP Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Beed political BJP And NCP : अजितदादांच्या बीड दौऱ्यात मोठी घडामोड; कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे...

DCM Ajit Pawar Visits Beed Bjp Pankaja Munde Ncp Dhananjay Munde & MP Bajrang Sonwane Appear Together : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर असताना मुंडे बहीण-भाऊ अ‍ॅटिव्ह होते.

Pradeep Pendhare

Ajit Pawar Beed visit : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे त्यांच्या दौऱ्यात पूर्णवेळ सहभागी होते. पण इथं एक मोठी राजकीय घडमोड घडली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे अजितदादांना भेटले. यावेळी मुंडे बहीण-भाऊ अजितदादांची वाट पाहत एकत्र उभे असताना, त्याचवेळी तिथं खासदार बजरंग सोनवणे आले. खासदार सोनवणे उभ्या असलेल्या मुंडे बहीण-भावांसमोरून गेले. यावेळी तिघांनी एकमेकांकडे साधे पाहिले सुद्धा नाही. या तिघांमध्ये झालेली ही राजकीय घडामोडी बीड जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा विषय ठरली असून, जु्न्या घटनांना उजाळा देणारी ठरली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील (Beed) राजकीय गुन्हेगारी राज्यात चर्चेत आहे. आता पुन्हा शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामुळे पुन्हा बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आली. यातून बीडमधील राजकीय गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द चौहू बाजूने घेरलं गेले. यातच करुणा मुंडे यांच्या न्यायालयीन लढ्यातही धनंजय मुंडेंना दणके बसले. यामुळे धनंजय मुंडे बॅकफूट गेले होते.

आरोपांच्या गदारोळात धनंजय मुंडे यांचे महायुती (Mahayuti) सरकारमधील मंत्रिपद गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर अजितदादा बीड जिल्हा दौऱ्यावर होते. धनंजय मुंडेंनी त्यावेळी अजितदादांच्या दौऱ्यात नसलेला सहभाग चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी ते मुंबईत होते. अजितदादा आज बीड दौऱ्यावर असताना भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू आमदार धनंजय मुंडे प्रचंड अॅटिव्ह होते.

अजितदादा बीड दौऱ्यावर असताना, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील नव्याने उभारलेल्या इमारतींची पाहणी आणि मॉड्युलर ऑपरेशन थीएटर व सर्जिकल वार्डचे लोकार्पण केले. अजितदादा महाविद्यालयाची पाहणी करत असताना भाजप मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू आमदार धनंजय मुंडे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर येऊन थांबले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंडे बहीण-भाऊ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर येऊन थांबले असताना, आतामध्ये अजितदादांची भेट घेऊन खासदार बजरंग सोनवणे बाहेर पडले. मुंडे बहीण-भावासमोरून खासदार सोनवणे बाहेर पडले. कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारे आमने-सामने आले असताना, त्यांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. या तिघांची ही कृती, बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे चौहू बाजूने विरोधकांच्या निशाण्यावर आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार मुंडेंवर टीका करत आहेत. यातच आमदार मुंडे यांची बहीण भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या पक्षातील आमदार सुरेश धस यांनी बीडमधील राजकीय गुन्हेगारीवरून वेगवेगळे गौप्यस्फोट करताना 'आकाचा आका', असा केलेला शब्दप्रयोग करत आमदार मुंडेवर निशाणा साधत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT