Beed NCP Meeting  Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar Meeting : बीडमध्ये आज अजितदादांची तोफ धडाडणार ; मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

सरकारनामा ब्यूरो

Beed : अजित पवार गटाची राज्यातील पहिली जाहीर सभा आज (रविवार) बीडमध्ये होत आहे."बारामतीकर जेवढे अजितदादांवर प्रेम करतात त्याच्यापेक्षा अधिक प्रेम बीडकर दादांवर करतात, हे आपल्याला सभेतून दिसून येईल. "जे काही मला बोलायचंय ते मी सभेत बोलेल. आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला पाहायला मिळेल," अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे सभेत काय बोलणार याबाबत त्यांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका पाहायला मिळाली आहे.उपमुख्यंत्री अजित पवार काय बोलणार यांची उत्सुकता आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यश्र सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित राहणार आहेत.

या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत असून अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

छत्रपती संभाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, जालना रोड, बार्शी रोड व नगर रोडवर जागोजागी स्वागत बॅनर, भव्य कटआऊट्स तसेच स्वागत कमानी उभारल्या आहेत.

सभेसाठी नेते शहरात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील, त्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फेरीची सुरुवात होणार आहे. केरळ येथील खास बँड पथक, पंजाब येथील बँड पथक, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील बँड पथक, त्रिपुरा येथील बँड पथक, मुंबई येथील पारंपरिक ढोल -ताशा पथक असणार आहे. फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर शिवाजी महाराजांना अभिवादन करून नेत्यांचे सभास्थळी आगमन होणार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT