Vijay Wadettiwar on Ajit Pawar : वडेट्टीवार म्हणतात, "अजितदादांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शरद पवारांनी हे पाऊल उचललं..

NCP News : शरद पवार यांचं हे पाऊल नक्की यशस्वी होणार
Vijay Wadettiwar, Sharad Pawar
Vijay Wadettiwar, Sharad PawarSarkarnama

Nagpur : "पहाटेच्या शपथविधीनंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते,” असे शरद पवारांनी अजित पवार यांच्याबाबत म्हटले आहे. 'अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी बोललो नव्हतो. त्यांना पुन्हा संधी नाही,' असे विधानही पवारांनी केलं. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटाला टोला लगावला. ते म्हणाले, "अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी हे पाऊल उचललं आहे,"

Vijay Wadettiwar, Sharad Pawar
Vinayak Raut News : शरद पवारांकडे पाठ फिरवणारा गट मोदींना दैवत मानतो ; राष्ट्रवादीत फूट की गद्दारी ? ; विनायक राऊतांचा सवाल

"शरद पवारांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येतात. शरद पवार जिद्दीने मैदानात उतरले आहेत.अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचललं आहे. शरद पवार यांचं ते पाऊल नक्की यशस्वी होणार आहे," असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, “राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या दोन खासदार आणि नऊ आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे,”

Vijay Wadettiwar, Sharad Pawar
Sharad Pawar On Bachchu Kadu : बच्चू कडूंचे नाव काढताच शरद पवार म्हणाले, "गल्लीबोळातल्या लोकांबाबत मला विचाराल..."

आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास

शरद पवार हे देशपातळीवर ‘इंडिया’ आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीसोबत असल्याचे वडेट्टीवारांनी ठणकावून सांगितले. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे महाराष्ट्राचे आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. ते पुरोगामी विचारांना धरून पुढे निघाले आहेत, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही. माध्यमांना त्यांच्या बोलण्यात विसंगती वाटत असली तरी आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास आहे, आणि त्यांच्या वक्तव्यांमध्ये कोणतीही विसंगती दिसत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com