Let.Congress Mla Raosaheb Antapurkar
Let.Congress Mla Raosaheb Antapurkar Sarkarnama
मराठवाडा

देगलूर-बिलोली पोटनिवडणूक ३० ऑक्टोबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी..

सरकारनामा ब्यूरो

नांदेड ः काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदारसंघासाठी येत्या ३० आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली मतदारसंघासह देशातील अन्य राज्याच्या पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला. यात देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. देगलूरचे काॅंग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेतली जात आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानूसार १ आॅक्टेबरपासूर उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ आॅक्टेबर असेल. ११ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी आणि त्यानंतर १३ आॅक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. ३० आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होऊन २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे.

या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या लोकसभा मतदारसंघातील हा विधानसभा मतदारसंघ असून तो काॅंग्रेसकडेच राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून २००९ मध्ये निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

पुन्हा २०१९ मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव करत दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली होती. कोरोना काळातही त्यांचे काम सुरू होते. वाडी, वस्त्या-तांड्यावर तसेच शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात दिला होता. परंतु अचानक त्यांना कोरोनाने गाठले, आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT