'गेवराई मतदारसंघावर राष्ट्र्वादीचाच झेंडा फडकणार' जयंत पाटील

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घ्या.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

बीड : गेवराईची मतदारसंघ (Gevrai constituency) राष्ट्रवादी काँग्रेससाठी (NCP) महत्त्वाची आहे आणि ती शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान ते आज गेवराई मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

यावेळी त्यांनी गेवराई मतदार संघाचा आढावा घेतला. ''परिवार संवाद यात्रेत गेवराई मतदार संघात सर्वात चांगले नियोजन आहे. इथल्या बुथ अध्यक्षांच्या बैठकाही नियमितपणे झाल्या आहेत. त्यांना नियमित कार्यक्रम दिले तर २०२४ मध्ये गेवराई मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात आपलं महाविकास आघाडीचं सरकार आहे पण केंद्रात नाही, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घ्या, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलनं करा,'' असे आवाहन यावेळी जयंत पाटलांनी केले.

Jayant Patil
कीर्तन चालू असताना शेख ताजोदिन महाराजांनी देह ठेवला

''मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम राज्याचे मंत्रिमंडळ करेल. गेवराई आणि आजूबाजूच्या परिसरात फुटलेल्या सर्व बंधाऱ्यांची लवकरच दुरुस्ती केली जाईल. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यांमुळे राज्यातील शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात सापडला,'' असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी ''गेवराईतील १९ पाझर तलावांच्या दुरुस्तीला तात्काळ निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, पालकमंत्री व जलसंपदा खात्याचा प्रमुख या नात्याने मी कॅबिनेटमध्ये तरतूद करुन देईन, ''असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

''गेवराईत राष्ट्रवादीची प्रचंड ताकद आहे. आपण पंचायत समिती, जिल्हा परिषद जिंकतो मग विधानसभेत नक्की काय होत, ''असा सवाल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तसेच, ''गेवराई विधानसभेतील पराभवाचा मनात राग असेल तर पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा निवडून दाखवा. तुमचं - आमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर गेवराईवर आपल्याला विजय मिळवायचाच आहे,'' असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com