Marathwada Political News : राज्याच्या सत्तेत फ्रंट सीटवर असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. (Shivsena Meeting News) सगळ्याच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे तयारी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनूसार शिवसेनेचे निरीक्षक एकनाथ भोईर मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कन्नड आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात मेळावा पार पडला.
कन्नड-सोयगाव मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. (Eknath Shinde) शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने या मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवल्याचे बोलले जाते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात (Shivsena) शिवसेनेच्या वतीने `शिव संवाद` मोहिमेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या अंतर्गत कन्नड विधानसभेत निरीक्षक एकनाथ भोईर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला. (Marathwada) बूथ रचना अधिक सक्षम करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून सरकारने केलेले कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे असे आवाहन भोईर यांनी केले. तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
कन्नड प्रमाणेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात देखील भोईर यांनी बैठक घेतली. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे घराघरांत पोहचवून पक्ष संघटनेवर भर द्या, असे आवाहन भोईर यांनी यावेळी केले.
शिवसंपर्क अभियानाअंतर्गत शिवसेनेचे गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक ही मोहिम सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच विकासाच्या विचारांचे पाईक होण्यासाठी शिवसेनेत सामील व्हा,असेही भोईल म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.