Shivsena UBT News : भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कुणाकडे? यावरून `इंडिया`, फ्रंटमध्ये अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. त्यातच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी थेट भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच `इंडिया`त येण्याचे आवाहन केले आहे. (Mp Vinayak Raut On Nitin Gadkari News) राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर गडकरी इंडियात आले तर त्यांना पंतप्रधान करू असे आश्वासनही त्यांनी देऊन टाकले. राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
मुळात गडकरी इंडियात येतील का? आले तर त्यांना पंतप्रधान करण्याचा अधिकार विनायक राऊतांना (Vinayak Raut) आहे का? असे प्रश्न उपस्थितीत करत राऊतांच्या या विधानाची खिल्लीही उडवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजप विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Nitin Gadkari) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राज्यातील भाजपविरोधी नेते, त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री यासाठी पुढाकार घेत आहेत.
देशपातळीवर एकच आघाडी असावी यासाठी इंडिया फ्रंटची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीची बैठक लवकरच मुंबईत होत आहे. (Shivsena) याचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने स्वीकारले आहे. याची तयारी जोरात सुरू असतांनाच मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या खासदार विनायक राऊत यांनी थेट नितीन गडकरी यांनाच इंडियात येण्याचे आवाहन केले आहे.
गडकरी इंडिया फ्रंटमध्ये सहभागी झाले तर आम्ही त्यांना पंतप्रधान करू, असेही राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले. हिंगोली येथे येत्या २७ रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पुर्वतयारीचा आढावा आणि बैठकीसाठी राऊत आले होते. नितीन गडकरी यांना संपविण्याचा भाजपाचा डाव आहे, महाराष्ट्र तो खपवून घेणार नाही. मराठी माणसाला संपविण्याचे कट कारस्थान सुरू आहे. गडकरी तुम्ही आवाज द्या, उद्धव ठाकरे तुमच्या सोबत असतील. तुम्ही इंडियामध्ये या तुम्हाला पंतप्रधान करू, असे राऊत म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.