Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Fadnavis on Thackeray: बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडून दिल्याचं जाहीर करा; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: "बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे यांच्या रुपाने जिवंत आहे".

सरकारनामा ब्यूरो

Dharashiva : धाराशिवमध्ये 'मोदी@9' निमित्त आज जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून दिल्याचे जाहीर करा, असे थेट आव्हान दिले.

फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार आहेत का?, कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला. त्यावर काही बोलणार आहेत का?, उद्धव ठाकरे सत्तेसाठी लाचार होणार का?, जर असे असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडून दिल्याचे जाहीर करा", असं थेट आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

"हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व खऱ्या अर्थाने आज एकनाथ शिंदे यांच्या रुपाने पुन्हा एकदा जिवंत करण्याचे काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपबरोबर येऊन सुरू केलं आहे. त्यामुळे जनतेचा आशीर्वाद आम्हाला सातत्याने मिळत आहे, आणि यापुढेही मिळत राहणार आहे", असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात मोफत लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. एवढंच नाही तर जगभरात कोरोना लस फक्त पाच देशांनी तयार केली. त्यामध्ये आपला भारत देश होता. मोदींनी भारतासह जागात तब्बल 100 देशांना कोरोना प्रतिबंधक लस पुरवली ", असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.

दरम्यान, "नरेंद्र मोदी यांनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती, आज आपल्या देशाला अमेरिका, रशियासमोर कटोरा घेऊन उभं राहावं लागलं असतं", असं वक्तव्यही फडणवीस यांनी यावेळी केलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT