Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis News : अटल सेतूला खरंच भेगा? काँग्रेसच्या आरोपांची फडणवीसांकडून पोलखोल

Jagdish Pansare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात चांगले यश मिळाले. या पक्षाचे तेरा खासदार निवडून आल्यानंतर पक्षाचे नेते राज्यातील महायुती सरकारवर तुटून पडले आहेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर आहेत. काल त्यांनी मुंबईतील अटल सेतू मार्गावर पडलेल्या भेगा दाखवत सरकारच्या निकृष्ट कामावर टीका केली होती. त्यानंतर आता सरकारने पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याचा आरोप केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर सडकून टीका करताना काल अटलसेतू आणि आज पाणीपट्टी ! फेकन्यूज आणि फेक नरेटिव्हची जणू फॅक्टरीच, अशा शब्दात काँग्रेसचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात ट्विट करत काँग्रेसकडून पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याच्या आरोपाचे खंडण करत हा निर्णय महाविकास आघाडी सरकारनेच घेतल्याचे जलसंपदा विभागाचे पत्र जारी केले.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने आता बातमी पसरवली, आताच्या सरकारने पाणीपट्टीत 10 पट वाढ केली. पण, खरोखर ही वाढ केली कुणी? 29 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) एक आदेश जारी केला आणि त्यानुसार ही दरवाढ झाली. ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळातच झाली आणि आता तेच आमच्यावर आरोप करतात.

2018 मध्ये प्रवाही आणि खाजगी उपसा सिंचनाचे दर वेगवेगळे होते. मात्र, 2022 मध्ये खाजगी उपसासाठी स्वतंत्र दर न देता, प्रवाहीचेच दर लागू करण्यात आले. त्यामुळे 500 ची वाढ 5000 रुपये झाली. हे पाप महाविकास आघाडी सरकारचे आहे आणि शेतकर्‍यांवर कोणताही भूर्दंड पडू नये, म्हणून त्यावर स्थगिती देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

येत्या आठवड्यात त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल. माझी माध्यमांनाही विनंती आहे की, निवडणुकीत विरोधक फेक नरेटिव्हसाठी बातम्या देत राहतील. पण, त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे. आता राज्यातील जनतेनेच ठरवावे, सुलतानी सरकार कोणते होते? अशा तिखट शब्दात फडणवीस यांनी काँग्रेसच्या आरोपावर पलटवार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT