Amol Mitkari News : महायुतीमध्ये अजित पवार यांना काही जण टार्गेट करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजितदादांनी प्रकाश आंबेडकरांसोबत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
समाजकारणात मी बाळासाहेबांना मानत आलो आहे. फुले शाहु आंबेडकरांचे वारसदार बाळासाहेब आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा एकत्र यावेत, अशीच माझी वैयक्तिक इच्छा आहे. हा सर्वार्थाने वरिष्ठांचा निर्णय आहे. आंबेडकर चळवळ राष्ट्रवादी सोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि पुढील राजकारण फार वेगळं असेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.
मागील काही घटना बघितल्या तर अजितदादांना Ajit Pawar एकटे पाडण्याची प्रयत्न दिसतो. मात्र, महायुतील काही घटक पक्षांनी असे प्रयत्न करू नयेत. कोणी यावं आणि काही बोलावं हे खपवून घेतले जाणार नाहीत, असे देखील मिटकरी म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांसोबत Prakash Ambedkar येण्याचा निर्णय हा सर्वाथाने वरिष्ठांचा निर्णय असेल. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार म्हणून श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांना आदर्श मानत आलोय.तर, राजकारणात अजितदादांना आदर्श मानत आलोय. आंबेडकरी चळवळ आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल,असे देखील मिटकरी यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.