Criem Case : उपजिल्हाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा कट त्याच्या पत्तीने आपल्या मित्रासोबत रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात संभाजीनगरमधील उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी तक्रार दिली आहे.
पत्नी सारिका हिने विष प्रयोगकरून तसेच अघोरी विद्येचा वापर करून तिच्या मित्राच्या मदतीने आपला हत्येचा कट रचल्याचे कटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच पत्नीने मित्राच्या मदतीने आपल्यावर पिस्तुल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे देखील कटके यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र कटके आणि सारिका यांचा आंतरजातीय विवाह आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत. देवेंद्र यांच्याकडे पत्नी सारिका हिने अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी हट्ट धरला. मात्र, आंतरजातीय विवाहमध्ये अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, लाभ मिळणार नसल्याचे लक्ष्यात आल्यानंतर सारिकाचे वर्तन बदलले.
कटके यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे असलेली कार त्यांची पत्नी वापरत होती. त्यांनी सुरक्षेसाठी त्या गाडीला जीपीएस लावले होते. तीन मार्चला त्या गाडीबाबत अलर्ट त्यांना आला. त्यांनी गाडीचा पाठलाग केला असता त्या गाडीच्या शेजारी दुसऱ्या कारमध्ये विनोद उबाळे हा होता. त्याने आपल्यावर पिस्तुल रोखून जातीवाचक बोलला तसेच पत्नीने देखील जातीवाचक शिवीगाळ केली.
पत्नीने जातीवाचक शिवीगाळ करत नोकरांच्यासमक्ष तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेस, असे बोलून अपमान केला तसेच रक्तपात झाला तरी चालेल,अशी धमकी दिली. विनोद उबाळे आणि स्वतःच्या आईच्या मदतीने कटरचून अघोरी विद्येचा प्रयोग करून जेवणातून विषबाधा करून जीवे मारण्याचा कट रचल्याचे देखील देवेंद्र यांच्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक करण्यात आली असून देवेंद्र कटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नीच्या फोनवरील बोलण्यातून त्यांच्यावर जादूटोणा सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यांनी घरात पाहिले असता त्यांना त्यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली, फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य मिळून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.