Mla Pradip Jaiswal News
Mla Pradip Jaiswal News  Sarkarnama
मराठवाडा

Mla Pradip Jaiswal News : राजकीय चिखलफेकीपासून अलिप्त, आमदार जैस्वाल शिवपुराण कथेत रमले..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्याच्या राजकाणात सध्या यथेच्छ चिखलफेक सुरू आहे. विशेषतः शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. (Mla Pradip Jaiswal News) देश आणि राज्य पातळीवर सत्ताधारी आणि विरोधक रोज एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. अशा गढुळ झालेल्या राजकारण आणि त्यातील चिखलफेकीपासून कायम स्वतःला वेगळं ठेवणारे शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांची सध्या चांगली चर्चा सुरू आहे.

प्रदीप जैस्वाल यांनी १ जूनपासून शहरात पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचे आयोजन केले आहे. सात दिवस चालणाऱ्या या कथेसाठी विविध राज्यातून भाविक गर्दी करत आहेत. स्वतः प्रदीप जैस्वाल (Pradip Jaiswal) या कथेला उपस्थितीत राहून अध्यात्मात मन रमवत आहेत. (Aurangabad) कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे वास्तव या दरम्यान जैस्वाल यांच्या घरीच असल्याने त्यांना गुरूंचा देखील सहवास लाभत आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा बंड झाले तेव्हा प्रदीप जैस्वाल यांनी देखील त्याला साथ दिली होती. (Shivsena) मात्र पक्ष सोडल्यापासून ते आजतागायत जैस्वाल यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गट किंवा त्या पक्षाच्या कुठल्याही नेता, आमदार, पदाधिकारी, साध्या शिवसैनिकाबद्दल देखील अपशब्द काढले नाहीत.

जैस्वाल शिंदे गटासोबत असले तरी त्यांनी ३०-३५ वर्ष ज्या पक्षात घालवले त्या पक्षाच्या नेत्यांबद्दलचा आदर राखल्याचे दिसून आले. शिवसेनेकडून ते आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर राहिले होते. एका वाॅर्डातून नगरसेवक निवडून येईल इतकी देखील आपल्या समाजाची मते नसतांना हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकारणातील अनेक मोठ्या पदावर पोहचवले याची आठवण जैस्वाल यांना पदोपदी येते.

अनेकवेळा खाजगी चर्चांमध्ये देखील ते याची कबुली देतात. पक्ष सोडल्यानंतर शिंदे गटातील इतर नेत्यांप्रमाणे जैस्वाल यांनी कधीही टीका केली नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देखील जैस्वाल यांच्यावर कधी टीका झाली नाही. महिनाभरापुर्वी पंडीत प्रदीप मिश्रा यांची नियोजित शिवपुराण कथा रद्द झाली आणि ही संधी प्रदीप जैस्वाल यांनी हेरली.

त्यांनी महाराजांशी संपर्क साधला आणि १ ते ७ जून दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात कथा घेण्याची विनंती केली. परंतु अवघ्या ७ दिवसात व्यवस्था कशी शक्य होईल, अशी विचारणा मिश्रा यांनी केली, तेव्हा मी सगळी व्यवस्था करतो असे सांगत त्यांनी परवानगी मिळवली. अवघ्या सात दिवसात छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील ४० एकर मैदानावर कथेची संपुर्ण तयारी आकारास आली.

गेल्या १ जून पासून राज्यासह बाहेरच्या राज्यातून आलेले लाखो भाविक या शिव महापुराण कथेला हजेरी लावत आहेत. आमदार जैस्वाल हे देखील आपल्या कुटुंबियांसह कथेचा लाभ घेत आहेत. राजकारणाची खालची पातळी गाठलेल्या चिखलफेकीपासून आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्वतःला दूर ठेवत अध्यात्मात मन रमवल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT