Gulabrao Patil News : राऊतांच्या कृत्यावरुन त्यांची संस्कृती कळते; गुलाबराव पाटील संतापले

Sanjay Raut News : संजय राऊत यांच्यावर चौफेर टीका
Sanjay Raut & Gulabrao Patil
Sanjay Raut & Gulabrao PatilSarkarnama

Gulabrao Patil, Sanjay Raut News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेंविषयी पत्रकार परिषदेत केलेल्या कृत्यावरुन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या कृत्यावरून त्यांची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे हे कळतेय. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे डोके फिरले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात बेड वाढवले आहेत; गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राऊतांचा समाचार घेतला.

Sanjay Raut & Gulabrao Patil
Nashik Politics : नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरुंग; राऊतांवर 'हा' आरोप; नगराध्यक्षासह सहा नेते व कार्यकर्ते शिंदेगटात...

राऊत यांना खासदार शिंदे यांच्या विषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. या वेळी खासदार शिंदेंचे नाव ऐकताच राऊतांनी थुंकले होते. त्यांचा ऑन कॅमेरा थुंकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यांच्या या कृत्यावरून राज्याचे राजकारण तापलेले राऊत यांच्‍या थुंकल्‍याच्‍या प्रकारावर पाटील यांनी टीका केली.

Sanjay Raut & Gulabrao Patil
Nagpur News : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह विविध मागण्यासाठी नागपुरात समता परिषदेकडून साखळी उपोषण

ज्या ४१ आमदारांनी राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवले. त्यांच्या नावाने हे थुंकताहेत. त्यामुळे राऊत यांना थोडी जरी लाज शरम असेल, तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा; अशी मागणी पाटील यांनी केली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com