Maratha Reservation News : धनगर, मराठा-ओबीसी अशा जातीजातीत भांडण लावायचे प्रयत्न फडणवीस यांचे आता फसले आहेत. तुम्हा मराठ्यांच्या नादाला लागूच नका, गुपचूप आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मांजरसुंबा येथील इशारा सभेत केली. तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डाग लागू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या 29 तारखेला मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षण आणि ते देखील ओबीसीमधूनच घेणार. ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे, एकाही मराठ्याने आता घरी थांबायचं नाही. आम्ही शांततेत मुंबईत येणार आहोत, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीस साहेब तुम्हाला महागात पडेल, असा निर्वाणीचा इशाराही या सभेत जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. आम्ही शांत बसलो आहोत म्हणून फायदा उचलू नका. मराठ्यांना त्रास देऊ का, एकदा मराठा समाजाने अक्राळविक्राळ रुप धारण केले की, कोणीही थांबवू शकत नाही.
आमच्यावर वार करायचे थांबवा, तुमच्या एका चुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डाग लागू शकतो. तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंय म्हणून समजा, पण आता तुमच्या आयुष्यात पश्चातापाचा दिवस येऊ देऊ नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. महायुतीचे सरकार म्हणजे एक तात्या अन् दोन अप्पांचा खेळ असल्याचे म्हणत जरांगे यांनी खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे, अजित पवार मोठं घर सोडून तुमच्याकडे आले. देवेंद्र फडणवीस यांनी जातींमध्ये भांडणं लावली, पण काहीच उपयोग होत नाही.
देवेंद्र फडणवीसांनी आता मराठ्यांच्या नादी लागू नये. गुपचूप आरक्षण द्यावे. आम्ही मुंबईत शांततेत जाणार आहोत, गणेशोत्सवाला कुठेही गालबोट लागू देणार नाही. मुंबईतील सर्व समाज बांधव देखील आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा कोणताच डाव यशस्वी होणार नाही. त्यांनी अनेक जातींमध्ये भांडणं लावूनही उपयोग होत नाही. धनगर समाजाची, राज्यातल्या लाडक्या बहिणींचीही देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.
न्यायासाठी येतोयं, त्रास द्यायला नाही..
ऐन गणेशोत्सावत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यावर मुंबई ही न्यायाची भूमी आहे, मुंबईकरांनो आम्ही चार महिन्यांपासून सांगतोय, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा. आम्ही तुमची लेकरं आहोत, आम्ही तिकडे न्यायासाठी येतोय, कोणाला त्रास द्यायला येत नाही. हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय. तुमचा गणपती बाप्पा आणि आमचा गणपती बाप्पा एकच आहे, असे जरांगे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.