Manoj Jarange Patil News : फडणवीसांच्या आदेशावरून मराठ्यांना त्रास देऊ नका, सत्ता, सरकार बदलत असते! डीजेच्या वादावरून जरांगेंचा पोलीसांना इशारा..

Manoj Jarange Patil expressed anger over the DJ ban in Beed and issued a strong warning to the police. : आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार.
Manoj Jarange Patil Rally In Beed Manjarsumba News
Manoj Jarange Patil Rally In Beed Manjarsumba NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीडचे मराठे एकत्र यायला लागलेत, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळं. मला एक लक्षात आलं इथ आल्यानंतर न मिळणाऱ्या गोष्टी आपल्याला आता मिळू लागल्या आहेत. परिस्थितीने आपल्यावर संकट आणल आहे. त्याच्याशी कसं लढायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आपली ताकद मोठी, फक्त आपण विचाराने चाललो नाही, म्हणून आपल्या लेकराबाळांच नुकसान झालं. आता दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्या डोक्याने चालायचं, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या मांजरसुंबा येथील इशारा सभेतून केले.

उन्हातान्हात तुम्ही बसला मला याचा गर्व वाटतो. तुम्ही कशाचाच विचार करत नाही, आपल्याला शांततेत जायचं आणि शातंतेत यायचंय. सत्ता बदलत असती, येत असते जात असते. माझ्या डोक्यात बसणाऱ्याचा मी बाजार उठवत असतो. डीजेमध्ये दहशतवाद्याच्या बंदूका आहेत का? बंद तर बंद, पण यापुढे बीडमध्ये कोणाचा डीजे वाजला तर बघतो. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असले चिल्लर चाळे करतो का? शांततेत माझी जात मागणी करत आहे, डीजेचा विषय घडवून तुम्हाला बीडमध्ये दंगल घडवायची होती का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून केला.

या भानगडीत नका पडू, कारण सत्ता बदलणार आहे. मला या विषयावर बोलायचं नव्हतं.. माझ्या मराठ्याकडून तुम्हाला त्रास आहे का? डीवायएसपीच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका, मी मुंबईत येतोयं.. मग बघू कोणात किती दम आहे. पोलीसांना हात जोडून विनंती आहे, माझ्या लेकरांना त्रास देऊ नका, तुम्हाला फडणवीसांचे आदेश आहेत का? पण लक्षात ठेवा, सत्ता, सरकार बदलत असते, मग आम्ही सोडणार नाही. पोलीस आमचे शत्रू नाहीत, तुम्ही आमचे बांधवच आहात. आमच्या समाजाने तुम्हाला कायम मदतच केली आहे. अंतरवालीत तुम्हाला पाणी दिले, जेवायला दिले, मग आमच्या पोरांना अडकवण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या सांगण्यावरून करू नका, असे आवाहनही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.

Manoj Jarange Patil Rally In Beed Manjarsumba News
Manoj Jarange Patil : चंद्रकांतदादा गेले राधाकृष्ण विखे आले; मनोज जरांगे म्हणाले, 'बैल पोळ्याला खांदे बदलले,येड्यात काढू...'

पळापळी सुरू झाली, आतून फाटली..

मराठा आरक्षण ते देखील ओबीसीमधून घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही. आपली ताकद आणि एकजूट पाहून सरकारची आतून फाटली आहे, त्यांची पळापळ सुरू झाली आहे. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही, आमच्या मागण्या मान्य करा, अंमलबजावणी करा. कायदा व सुव्यवस्था बिघडलं असं काही करू नका, फार हौस असले तर महादेव मुंडेचे आरोपी पकडून आणा, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील पोलीसांना सुनावले.

Manoj Jarange Patil Rally In Beed Manjarsumba News
Maratha vs OBC reservation : मनोज जरांगे-लक्ष्मण हाकेंचा बैठकींचा धडाका; कुणाच्या बैठकीला किती गर्दी? नियोजन जुळलं की, फिस्कटलं?

आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.

Manoj Jarange Patil Rally In Beed Manjarsumba News
Beed ZP News : बीड जिल्हा परिषदेची प्रभाग रचना जाहीर, केजमध्ये एक गट दोन गण वाढले!

तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावं. कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com