Devendra Fadanvis Latest News, Aurangabad
Devendra Fadanvis Latest News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnvis News : मंत्रीमंडळ विस्तार करू, पण योग्यवेळ आल्यावर; इच्छूक पुन्हा गॅसवर..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर कुठलीही चर्चा झालेली नाही. मंत्रीमंडळ विस्तार आम्ही जरूर करू, पण योग्यवेळ आल्यावर असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले. मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुन्हा हुकल्याने इच्छूकांचा मात्र परत एकदा हिरमोड झाला आहे.

२६ जानेवारीला मंत्री, पालकमंत्री म्हणून झेंडा वंदनाला सूट, ज्योतपूरी घालून हजर राहता येईल, असे स्वप्न रंगवणाऱ्या इच्छूक मंत्र्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. (Cabinet Expansion) राज्यमंत्रीमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच चर्चाच झाली नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. औरंगाबाद (Aurangabad) येथे जिल्हा नियोजन आराखडा मराठवाडास्तरीय बैठकीसाठी फडणवीस आज औरंगाबादेत आले होते.

यावेळी प्रसार माध्यमांनी मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात विचारणा केली. यावर फडणवीस म्हणाले, मंत्रीमंडळ विस्तार आम्हाला करायचा आहे, पण तो योग्यवेळ आल्यानंतर केला जाईल. दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. आचारसंहितेमुळे आजच्या बैठकीत ठोस निर्णय घेता येणार नाही, परंतु सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव घेवून ते तपासू आणि नंतर शक्य तितका निधी मराठवाड्याला देवू असेही फडणवीसांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येवून सहा महिने उलटले, परंतु मंत्रीमंडळ विस्तार काही होईना. सध्या असलेल्या मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा पदभार आहे, त्यामुळे लवकर विस्तार करून नव्या मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात, अशी मागणी होत आहे. विरोधकांकडून तर यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील केली जात आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी संजय शिरसाट, गोगावले आदी इच्छूकांची खिल्ली देखील उडवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र या दौऱ्यात मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चाच झाली नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे इच्छूक पुन्हा एकदा गॅसवर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT