मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजणी येथे सर्व निकष बाजूला ठेवून मदतीची घोषणा केली.
मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.
या घोषणेमुळे मदत आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या मागण्यांमध्ये तफावत स्पष्ट झाली.
Marathwada Heavy Rainfall News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना महत्वाची घोषणा केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतांना सगळे निकष बाजूला ठेवून मदतीचा शब्द त्यांनी दिला. यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी काही शेतकऱ्यांनी केली. टंचाई म्हणजेच दुष्काळ असे स्पष्ट करत त्याच प्रमाणे मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी एक शेतकरी घोषणाबाजी करत होता, त्याला ये बाबा इकडे राजकारण करू नको, अशा शब्दात फडणवीस यांनी सुनावले. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाने नद्यांना पूर आला. हे पाणी शेतात घुसून पिके, जनावरे वाहून गेली, जमीन खरडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाण्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सरकार सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना वाढीव मदत करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. उजनी (ता. औसा जि. लातूर) येथील पूर परिस्थिती आणि पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सात वर्षांपूर्वी मी या उजनी गावात जलयुक्त शिवार योजनेसाठी आलो होतो. तेव्हा पाणी नव्हते आता पाण्याने थैमान घातले आहे. या कठीण परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्याला व नुकसान झालेल्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पहिला हप्ता म्हणून 2003 कोटी रुपये सरकारने मंजूर केले असून तातडीने ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जातील.
आपल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील आपण चिंता करण्याची गरज नाही. सरकार पाठीशी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी करणार, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा घोषणा दिल्या. तेव्हा फडणवीस काहीसे चिडले, ये बाबा इथे राजकारण करू नको, अशी ताकीद दिली.
लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, अभिमन्यू पवार, बसवराज पाटील यावेळी त्यांच्यासोबत होते. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, ढगफुटी, पूराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. तातडीच्या मदतीसह कर्जमाफी आणि ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
प्र.१: फडणवीसांनी उजणी येथे काय घोषणा केली?
उ.१: त्यांनी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.
प्र.२: शेतकऱ्यांनी का घोषणाबाजी केली?
उ.२: शेतकऱ्यांची मुख्य मागणी कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची होती.
प्र.३: मदतीच्या घोषणेनंतरही शेतकरी समाधानी का नाहीत?
उ.३: कारण मदत अपुरी असून शेतकऱ्यांचा भर कर्जमाफीवर आहे.
प्र.४: या सभेत शेतकऱ्यांची मागणी काय होती?
उ.४: कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची ठाम मागणी होती.
प्र.५: या घटनेचा राजकीय परिणाम होईल का?
उ.५: होय, कारण मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांचा रोष कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.