Maharashtra Government : अतिवृष्टी 2025 मध्ये अन् आर्थिक मदत 2 वर्ष जुन्या निर्णयानुसार : फडणवीस सरकारच्या नुकसान भरपाईवर शेतकरी नाराज

Maharashtra Government : अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मार्च २०२३ च्या जीआरनुसार मदत देण्याच्या निर्णयामुळे शेतकरी सरकारवर नाराज झाले आहेत.
Farmers in Vidarbha and Marathwada express anger as Maharashtra Govt announces compensation based on old March 2023 GR despite heavy rain damages.
Farmers in Vidarbha and Marathwada express anger as Maharashtra Govt announces compensation based on old March 2023 GR despite heavy rain damages.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government : महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले.

याशिवाय फडणवीस म्हणाले, अद्याप पंचनाम्याचे काम थांबवलेले नाही. नवनव्या ठिकाणी पाऊस पडत आहे. तिथे पंचनामे करून मदत केली जाईल. एखाद्या जिल्ह्यात आता कमी मदत दिसत असेल तरी उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी हा उद्देश आहे. घर, जमीन याबाबत नुकसानीची भरपाई देण्याचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. पैशांची कुठली कमतरता पडणार नाही याची काळजी घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

मात्र यानंतरही मराठवाडा, विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई मार्च २०२३ च्या शासननिर्णयानुसार दिली जाणार आहे. सध्या पिकांना असलेले हमीभाव व संभाव्य उत्पादन सरासरी यावर आधारित नसल्याने ३३ टक्क्यांवर नुकसान गृहीत धरून व २ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या मदतीमधून उत्पादनासाठी लागलेला खर्चही भरून निघणार नसल्याचा रोष शेतकरी व्यक्त करत आहेत.

Farmers in Vidarbha and Marathwada express anger as Maharashtra Govt announces compensation based on old March 2023 GR despite heavy rain damages.
Maharashtra Rain update : फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर; 8-10 दिवसांत बँकेत जमा होणार, मराठवाड्याला सर्वाधिक...

कोणत्या विभागाला किती निधी?

सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार, विदर्भातील अमरावती विभागातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्यांना ५६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर नागपूर विभागातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांना २३ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. पुणे विभागात सर्वात कमी नुकसान झाले आहे. विभागातील केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांना सुमारे १४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.

Farmers in Vidarbha and Marathwada express anger as Maharashtra Govt announces compensation based on old March 2023 GR despite heavy rain damages.
Maharashtra Heavy Rain : 'हिंदू नव्हे बळीराजा खतरे में, जाती-धर्मात वाद...'; राज्य सरकारवर टीका करत रोहित पवारांनी केली 'ही' मोठी मागणी

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल १० लाख ३५ हजार शेतकरी बाधित असून त्यांना ७२१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यात ३ लाख ८० हजार एवढे आहेत. त्याचप्रमाणे हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे. नाशिक विभागातील १७ हजार ३३२ शेतकऱ्यांना ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com