Devendra Fadnavis, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Devendra Fadnavis : देवेंद्रजी बाळासाहेबांनी आदरातिथ्य परंपरा जपली, ते न बोलावता पाकिस्तानात पंतप्रधानांचा केक कापायला गेले नव्हते!

Devendraji upheld Balasaheb’s tradition of hospitality, saying they never went to Pakistan uninvited to cut the Prime Minister’s cake. : विमान वळवून पाकच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेलेले नव्हते! ते ही न बोलावता, असा टोला दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Jagdish Pansare

Shivsena UBT : जावेद मियाँदादला घरी बोलावणारे तुम्हीच होते ना, उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा बघावा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. पाकिस्तान सोबत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. यावर संतापलेल्या फडणवीसांनी बाळासाहेबांनी जावेद मियाँदादला मातोश्रीवर बोलावले होते याची आठवण करून दिली. यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्‍यांवर टीका केली.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या संदर्भात 'एक्स'वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी न बोलावता विमान वळवून पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापायला गेले होते, याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करवून दिली. देवेंद्रजी, हिंदुस्थान-पाक सामन्यांवरून थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचे कारण नाही. घरी येणाऱ्याचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे, ती त्यांनी जपली.

विमान वळवून पाकच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेलेले नव्हते! ते ही न बोलावता, असा टोला दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. आपल्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे कुकर्म करणाऱ्या लोकांसोबत सामने न खेळण्याचा त्यांचा सिद्धांत कायम राहिला, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. (Devendra Fadnavis) हे असले भाष्य करून आपण त्यांच्या राष्ट्रभक्तीवर बोट दाखवत आहात का? कारण त्यांच्या सिद्धांतांचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्यांच्या कुबड्या घेऊन आपण सत्तेवर बसले आहात ना?

धंदो प्रथम, वंदे मातरम! हा आपल्या भाजप पक्षाचा नारा. कारण तुम्ही हिंदुस्थान-पाकिस्तान सामना अर्थकारणाच्या चष्म्यातून पाहता. आमच्यासाठी तो राष्ट्रभक्तीचा विषय आहे! ते तुम्हाला कळणार नाही. कळले तरी वळणार नाही, अशा शब्दात दानवे यांनी भाजपाला सुनावले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला परवानगी देणार आहात. आॅपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते, की मेरे रग रग मे खून नही, सिंदूर बह रहा है.. मग त्या गरम सिंदूरचे आता काय कोल्ड्रिंक झाले आहे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामन्यावरून लगावला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील काही अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, अशावेळी पाकिस्तानसोबत क्रिकेट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT