Manoj Jarange VS Devendra Fadnavis : 'फडणवीस शिदेंना काम करू देत नाही, हे सिद्ध झालं', मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा

Maratha Reservation Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहे. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. मुंबईत 29 ऑगस्टला ते आंदोलन करणार आहेत. दरम्यान, रविवारी (ता.24) त्यांनी बीडमध्ये सभा घेतली. या सभेनंतर माध्यमांशी बोलताना 'आम्ही जे म्हणत होतो की देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसाहेबांना काम करू देत नाही हे आता सिद्ध झालंय, असा दावा केला.'

जरांगे पाटील म्हणाले, आम्ही म्हटलो होतो की फडणवीस शिंदेसाहेबांना काम करू देत नाही. त्यावेळी फडणवीसांनी म्हटलं होतं की शिंदेंना विचारा मी काम करू देतो की नाही ते. पण असं कोणी सांगतं का? काम करू देत नाही, असा टोलाही जरांगे यांनी लगावला.

'ते (फडणवीस) येऊन आठ महिने झाले आहेत. तरी देखील ते आरक्षण देत नाही. याचा अर्थ त्यांनी त्यावेळी शिंदेसाहेबाला काम करू दिलं नाही, अजितदादाला आरक्षणाचं काम करू दिलं नाही.' , असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले.

Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Bhagwa Shawl Controversy : तळ कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत! 'काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून...' उदय सामंतांचा टोला

...तर मंत्रालयावर गुलाल उधळू

बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही आरक्षणाच्या मागणीसाठी येतोय. तुम्ही म्हणताय पोलिस बघून घेतील. पण कधीकधी सत्तापालट देखील होत असते. तु्म्ही आरक्षण दिलं तर मुंबईला येण्यावेळी वेळ येणार नाही आम्ही इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळू, असे म्हणत जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही मुंबईला येणार काय करायचं ते करा, असा इशारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटील यांनी दिला.

Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde
Boat Accident : धक्कादायक! गेटवे ऑफ इंडियाजवळ पुन्हा नेव्ही बोटीची धडक; प्रवाशांचा जीव धोक्यात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com