Dhananjay Munde speaks emotionally during the Beed DPDC meeting chaired by Sunetra Pawar, remembering Ajit Pawar’s commitment toward hostel projects in the district. Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : 160 कोटींचा निधी मिळाला, अजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण केला! धनंजय मुंडे भावूक; म्हणाले, "आता बीडच्या विकासासाठी..."

Beed DPDC Meeting : बीड डीपीडीसी बैठकीत धनंजय मुंडे भावूक झाले. संत भगवान बाबा वसतिगृहांसाठी 160 कोटी निधी मंजूर झाल्याने अजित पवारांनी दिलेला शब्द पूर्ण झाल्याची कृतज्ञ आठवण त्यांनी व्यक्त केली.

Jagdish Pansare

Ajit Pawar Memory News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा भावूक झाल्याचे पहायला मिळाले. अजितदादा शब्दाचे पक्के होते, एकदा शब्द दिला की ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाहीत. बीड जिल्ह्यात संत भगवान बाबा शासकीय वसतीगृहाच्या माध्यमातून मुला-मुलींसाठीच्या 11 वसतिगृह उभारणीसाठी 160 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या संदर्भात आठवण सांगताना अजितदादांनी आपल्याला दिलेला शब्द पूर्ण केला, अशी भावना धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्य शासनाने लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री असताना सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात प्रत्येकी शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण 11 वसतिगृहे उभारणीस 159.36 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.

याआधी जिल्ह्यात 3 वसतिगृहे उभारणीचे काम प्रगतीपथावर असून आणखी 11 वसतिगृहे उभारणीस शासनाने जागेसह भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित 8 वसतिगृहे देखील लवकरच उभारली जाणार आहेत. बीड येथील एका ऊसतोड कामगार मेळाव्यात बोलताना अजितदादांनी मला याबाबत शब्द दिला होता. आज परळीसह, केज, गेवराई, माजलगाव, पाटोदा येथे प्रत्येकी 2 तर बीड तालुक्यातील एक अशी 11 वसतिगृहे निधीसह मंजूर होताना पाहून दादांची कृतज्ञता पूर्वक आठवण आल्याशिवाय राहत नाही!

या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांचे सहृदयी आभार, अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, गुरूवारी (ता.12) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही धनंजय मुंडे यांनी सगळे मतभेद विसरून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.

बीड जिल्ह्याच्या विकासाचे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी योगदान देऊ, अशी भावनिक सादही मुंडे यांनी यावेळी घातली. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडल्यानंतर पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादा हे मला कायम वडिलकीचा आधार देणारे होते. माझे आणि त्यांचे नाते अतिशय वेगळे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ वैयक्तिक नाही तर जिल्ह्याचेही मोठे नुकसान झाले आहे. दादांनी अल्प काळात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते, याची आठवणही धनंजय मुंडे यांनी आवर्जून यावेळी सांगीतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT