Beed Police Bharti : वर्दीचं स्वप्न डोळ्यांत… पण मैदानावरच अखेरचा श्वास; बीड पोलिस भरतीत दुर्दैवी मृत्यू

Police Bharti Ground Test Accident: बीडमध्ये पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या युवकाचा मैदानाची चाचणी दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
Maharashtra Police Recruitment 2026
Maharashtra Police Recruitment 2026Sarkarnama
Published on
Updated on

Beed Police Recruitment: बीड पोलिस भरतीत एका युवक उमेदवाराची मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू झाला. दीपक भास्कर वाव्हळ, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मैदानी चाचणीत, तो 1600 मीटर धावत होता. यातच त्याला भोवळ आली, अन् तो कोसळला. बराच वेळ उठला नाही म्हणून, पाहिल्यावर त्याला बीड पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तापसणीत त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकारामुळे बीड पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

बीड (Beed) पोलिस दलात, 174 पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. या जागांसाठी एकूण 8134 उमेदवार मैदानात आहेत. भरती प्रक्रियेला पहाटे पाच वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. दुपारच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू असताना, उमेदवाराचा मैदानावरच दीपक वाव्हळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दीपक वाव्हळ हा मैदानात 1600 मीटर धावण्याची चाचणी देत होता. पळत असतानाच, तो कोसळला अन् त्यात त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेद्वारे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीत, मृत्यू झाल्याची घोषणा केली. या घटनेने पोलिस (Police) भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या अनेकांना धक्का बसला आहे.

Maharashtra Police Recruitment 2026
Postage Stamp Black Market : पोस्ट ऑफिसचं ‘तिकीट’ बनलं काळाबाजाराचं सोनं! मुंबई पोलिसांची दिल्लीमध्ये थेट धडक, टोळीचा भांडाफोड

बीडमधील भरती पोलिसी अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मैदानावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून, सीसीटीव्हीसह ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. पोलिस देखील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करत, सहकार्य करत आहेत. यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने, सर्वच आवाक झाला आहेत.

Maharashtra Police Recruitment 2026
ShivsenaUBT Vs BJP : मोदी-ठाकरे नावांवरून रणांगण पेटलं! ‘चोर है’च्या घोषणा; भाजप-ठाकरसेना नगरसेवक आमने-सामने

दरम्यान, शवविच्छेदनासाठी उमेदवाराचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. परंतु अनेक स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते.

उमेदवारी दीपक वाव्हळ याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे उत्तरीय तपासणीनंतरच समोर येईल. धावत असतानाच, त्याना हृदयविकाराचा झटका कि, हृदय बंद पडले, यावरून चर्चा सुरू आहेत. परंतु, मैदानाची चाचणी दुपार ऐवजी सकाळच्या सत्रात घ्यावी, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऊन वाढत आहेत. सकाळपासून मैदानावर उमेदवार असतात, त्यात नाश्ता, जेवणाची देखील ब्रेक मिळत नाही. भरती प्रक्रिया डिस्टर्ब होते, म्हणून ते प्रशासन देखील उमेदवारांच्या खाण्यापिण्यासाठी सोडत नाहीत, असे निदर्शनास येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com