NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता, तेव्हा 2014 मध्ये अजितदादांनी मला विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर काम करण्याची संधी दिली. माझ्यापेक्षा चांगले, सक्षम नेते असताना दादांनी मला संधी दिली. ती संधी तेव्हा दिली नसती तर धनंजय मुंडेचं नाव कुणालाही कळालं नसतं, अशा शब्दात आमदार धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज स्वीकारली. या कार्यक्रमात पक्षाच्या अनेक नेत्यांची भाषणं झाली. प्रत्येकांनी अजित पवार यांच्यासोबतचा सहवास, त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. प्रत्येक संकटाच्या काळात अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना आधार, साथ दिली.
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात अजित पवारांनी दिलेल्या संधीमुळेच आपली राज्यात ओळख असल्याची प्राजंळ कबुली मुंडे यांनी दिली. 2014 मध्ये अजित पवार यांनी आपल्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबादारी टाकली. माझा त्यांचा प्रदीर्घ सहवास नसला तरी 15 वर्ष मी अजितदादा यांच्यासोबत होतो.
ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात होता त्यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. अनेक मान्यवर त्यावेळी होते, जबाबदारी सांभाळणारे अनेक दिग्गज होते. परंतू, तरीही मला संधी देण्यात आली. ती मिळाली नसती तर माझं नाव कुणाला कळलं नसतं, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
2014 ते 2019 दरम्यान, महाराष्ट्रात पक्षाने पाच यात्रा काढल्या आणि 2019 मध्ये पक्षाच्या सदस्यांची संख्या वाढली. आज दादा आपल्या सोबत नाहीत, पण आज वहिनी तुमच्यात आम्ही दादांना पाहत आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.