Sunetra Pawar: अखेर शिक्कामोर्तब! सुनेत्रा पवार बनल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा; पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात झाली घोषणा

Sunetra Pawar: मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यंमत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागी त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली.

प्रफुल्ल पटेलांनी केली घोषणा

मुंबईतील वरळी डोम इथं राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज (२६ फेब्रुवारी २०२६) सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं. सुरुवातीला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला इथं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 'एकच वादा अजित दादा', 'सुनेत्रा वहिनी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या. त्यानंतर या सर्वांनी आपला हात उंचावून प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं दर्शवलं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, मी तुमच्या सर्वांच्यावतीनं ही घोषणा करतो की, "सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे"

Sunetra Pawar
Kirit Somaiya : सोमय्यांनी मालेगाव गाजवलं... पण एमआयएमचे आमदार शांत का? ते भाजपला घाबरतात का? समाजवादी पक्षाचे थेट सवाल

अजित पवारांचं कौतुक

प्रफुल्ल पटेल म्हणाले, "२८ जानेवारीच्या दिवशी अजित पवार आपल्यामधून निघून गेले ही आपल्या सर्वांसाठी अतिशय धक्कादायक घटना होती. आपल्या सर्वांना उद्या आपण काय करणार? कसं करणार? अशा मानस्थितीत आपण होतो. अजितदादांनी इथं बसलेल्या प्रत्येकाकडं त्यांच्या आठवणी आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काग्रेस माझं कुटुंब असल्याचं भावनेनं काम केलं. त्यांच्या मनात नेहमी असायचं की जोपर्यंत मी माझ्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ताकद देण्याचं काम करणार नाही तोपर्यंत माझा पक्ष वाढू शकत नाही, ही त्यांची प्रामाणिक भावना होती. एखादं नेतृत्व कशाप्रकारचं असावं याचं अजित पवार हे एक उदाहरण होते"

Sunetra Pawar
Pune passport office : पुण्यातील पासपोर्ट ऑफिस बॉम्बेने उडवून देण्याची धमकी; पोलिस 'अलर्ट मोड'वर, पण तपासातील 'त्या' ट्विस्टने सगळेच चक्रावले!

सर्वात मोठा पक्ष बनवण्यात दादांचं योगदान

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं की, एका विमनस्क मनस्थितीत आपण इथं जमलेलो असताना कर्तव्य म्हणून उद्याची जबाबदारी ज्यांनी धिरोदत्तपणे स्विकारुन महाराष्ट्रात एक वेगळा आत्मविश्वास केला आहे, अशा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानतो. दादांच्या अनुपस्थितीत आज राष्ट्रीय अधिवेशन पार पडण्याची नियतीनं दुर्देवी वेळ आपल्यावर आणली आहे. २१ व्या शतकातील देशातील एक वलंयाकित नेतृत्व म्हणून अजित पवारांकडं पाहिलं आहे. अजित पवारांनी चांदा ते बांदा फिरत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणावर विस्तारला. १९९९ मध्ये ५४ ते ५७ पर्यंत जागा मिळवण्यात आपण मर्यादित राहिलो होतो. पण २००४ मध्ये विधानसभेत ७३ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरला, त्यात सर्वाधिक योगदान हे अजित पवारांचं होतं याचा नम्रपणे उल्लेख या ठिकाणी करायला हवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com