Suresh Dhas-Ajit Pawar On Beed Issue News Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas On Ajit Pawar : अजित पवारांनी क्लीन चीट दिली, तर आम्ही धनंजय मुंडेंविरोधात कोर्टात जाऊ!, पण बोगसगिरी सिद्ध करूच

Suresh Dhas to take legal action, while Ajit Pawar gives a clean chit. : धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना तब्बल 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.

Jagdish Pansare

Beed Political News : बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये धनंजय मुंडे पालकमंत्री असतांना 73 कोटींची बोगस बिलं उचलली गेली, असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. बीडचे विद्यमान पालकमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. परंतु अशी कुठलीही बोगस बिलं उचलण्यात आलेली नसल्यामुळे अजित पवार यांना अजित पवारांनी क्लीन चीट दिली, याकडे माध्यमांनी धस यांचे लक्ष वेधले.

यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) धनंजय मुंडे यांना बोगस बील प्रकरणात क्लीन चीट दिली तर आम्ही हे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ. जिल्हा नियोजन समितीतील 73 कोटींची बोगस बीलं कशी उचलली गेली? तिथे सिद्ध करून दाखवू, असे धस यांनी म्हटले आहे. बीडमध्ये आकाच्या टोळ्या अजूनही कार्यरत आहेत, असा दावाही धस यांनी माध्यमांशी बोलताना केला.

धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना तब्बल 73 कोटी रुपयांची बोगस बिले उचलली, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. परळी आणि अंबाजोगाई मतदारसंघात 1 रुपयाचेही काम न करता 73 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आले. 2021-22 दरम्यान, जेव्हा मुंडे पालकमंत्री होते.

त्या काळात परळी-अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करत कोट्यावधींची बिले उचलली, असा दावा आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बीडच्या डीपीडीसी बैठकीत त्यांना दिली होती. यावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. परंतु या अहवालानूसार अशी कोणत्याही प्रकारची बोगस बील उचलण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांचा 73 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप फेटाळत धनंजय मुंडे यांना क्लीन चीट दिल्याचे बोलले जाते. या संदर्भात मुंबईत माध्यमांनी जेव्हा सुरेश धस याना प्रश्न विचारला तेव्हा आपण कोर्टात बीलं उचलण्यात झालेली बोगसगिरी सिध्द करू, असे म्हणत प्रतिआव्हान दिले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT