Dhananjay Munde Meet Ajit Pawar : आजाराचे कारण सांगून बीडचा दौरा टाळणारे धनंजय मुंडे अखेर अजितदादांसोबत दिसले!

NCP Weekly Meeting Dhananjay Munde Meet Ajit Pawar : आजाराचे कारण देत अजित पवारांच्या बीडच्या दौऱ्यावेळी अनुपस्थित असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी उपस्थित होते.
Dhananjay Munde Ajit Pawar
Dhananjay Munde Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच बीडचा दौरा केला होता. या दौऱ्यात धनंजय मुंडे अनुपस्थित होते. मुंडे यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहिले नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच दिवशी ते मुलीच्या फॅशनशोमध्ये दिसले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अखेर अजित पवार आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत एकत्र दिसले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतील निवासस्थान देवगिरी येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीच्या लाॅनवर खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या तेथे राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी बसले होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती. या बैठकीत अजितदादांना मार्गदर्शन देखील केले.

Dhananjay Munde Ajit Pawar
Deenanath Hospital : डॉ. घैसास यांचे क्लिनिक फोडल्याच्या घटनेचे पुणे भाजपच्या बैठकीत पडसाद!

आसनव्यवस्थेमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान धनंजय मुंडे यांना देखील मिळाला. धनंजय मुंडे यांच्या शेजारी माजी आमदार नवाब मलिक बसले होते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांची खुर्ची होती. मंत्री नरहरी झिरवळ आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील अजितदादांच्या शेजारीच बसले होते.

...अन् अजितदादा संतापले

राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सर्व आमदार, नेते वेळेवर हजर होते. मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आले. त्यांना पाहाताच उशीरा आल्याने अजितदादांनी खडसावले. कोकाटे हे मीडियासमोर वादग्रस्त वक्तव्य करतात, जनता दरबारला देखील अनुपस्थित असतात यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केल्याचे समजते.

राष्ट्रवादीची बैठक कशासाठी?

राज्यातील विविध प्रश्नांबाबत तसेच विकास कामांचा आढावा घेण्यासाठी 'देवगिरी'वर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीविषयी अजित पवारांनी ट्विट करत माहिती दिली की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक आढावा बैठक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. प्रत्येकाच्या मतदासंघातील विकास कामांचा आढावा घेतला. निधीअभावी कामं रखडता कामा नये, लोकांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे अधिक कार्यक्षम होण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले.

Dhananjay Munde Ajit Pawar
Chandrakant Khaire v/s Ambadas Danve News : शिंदे- खैरे वादावर अंबादास दानवे यांचे हाताची घडी तोंडावर बोट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com