Beed News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले आहेत. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हात हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे चार्जशीटमध्ये समोर आल्यानंतर मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. महाराष्ट्रभरातून मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. त्यामुळे जनमतच मुंडे यांच्याविरोधात गेल्याचे दिसून आले होते.
त्याचवेळी "दोघे बहीण-भाऊ एकत्र आल्याने, मंत्री झाल्याने विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागले. त्यातूनच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू झाले आहे. पण मुंडे परिवार एकत्र आहे आणि धनुभाऊंच्या मागे भक्कमपणे उभा आहे, सांगून अजय मुंडे यांनी विरोधकांना ठणकावले. महाराष्ट्रभरातील जनमत मुंडे यांच्याविरोधात असताना पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश दिला. त्यामुळेच अजय मुंडे आहेत तरी कोण असा सवाल विचारला जात आहे.
वाल्मिक कराडनंतर धनंजय मुंडे यांनी जगमित्र कार्यालयाची जबाबदारी त्यांचे चुलत बंधु अजय मुंडे यांच्याकडे सोपवली आहेत. त्यामुळे अजय मुंडे जनता दरबारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. अजय मुंडे हे माणिकराव मुंडे यांचे थोरले चिरंजीव आहेत. माणिकराव मुंडे आणि गोपीनाथ मुंडे हे भाऊच होते. पण अजय मुंडे यांनी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांची साथ दिली.
धनंजय मुंडे भाजपमध्ये सक्रिय झाल्यापासून ते युवा मोर्चात एक एक पायरी चढताना अजय मुंडे धनंजय मुंडे यांच्यासोबतच होते. पुढे धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेल्यानंतर अजय मुंडे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंडे कुटुंबियांचे मुळ गाव असलेल्या नाथरा गावची ग्रामपंचायत ही अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. यामागे अजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे. अजय मुंडे हे 2007 साली स्वत: गावचे तरुण सरपंच राहिले आहेत. पुढे 2017 त्यांना पिंपरी बुद्रूक गटातून जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाले. ते जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. शिवाय जिल्हा परिषदेच गटनेतेही बनले.
अजय मुंडे यांच्या मातोश्रीही गावच्या सरपंच होत्या. त्यानंतर अजय मुंडे यांचे धाकटे भाऊ अभय मुंडे यांना संधी मिळाली. अजय मुंडे पांगरीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर बिनविरोध संचालक राहिले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्याक्षही होते. आजही अजय मुंडे धनंजय मुंडे यांचे विश्वासपात्र मानले जातात. मुंडे मतदारसंघात नसताना अजय मुंडे पूर्वीपासूनच सक्रिय असल्याचे दिसून येतात. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितितीत त्यांचे प्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होतात. आज ते धनंजय मुंडे यांच्या दुःखात तर सहभागी आहेतच. पण त्यांच्यासोबतही ठामपणे उभे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.