Suresh Dhas On Ajay Munde News : अजय मुंडे लहान, त्याला काही माहित नाही; धनंजय मुंडेंनी बोलावं, मग उत्तर देईन!

Ajay Munde is young and doesn’t know anything, says Suresh Dhas. He challenges Dhananjay Munde to come forward and speak, promising to respond to him. : सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत? हे माहित आहे. सुरेश धस यांना खोक्या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे,अशी मागणीही अजय मुंडे यांनी काल केली होती.
Suresh Dhas-Ajay Munde-Dhananjay Munde News
Suresh Dhas-Ajay Munde-Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : धनजंय मुंडे यांच्या आई परळीत न राहता नाथ्रा गावात जाऊन राहतात, त्यांचे भाऊ आणि कुटुंबही त्यांच्यासोबत नाहीत, असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मिडियावर व्यक्त होत धस यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर शांत बसणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी काल पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही हे वक्तव्य चुकीचे आहे. धस यांच्या आरोपांना अर्थ नाही . सध्या आमच्या घराचे काम सुरू आहे गावाला जाऊन राहणं गुन्हा आहे का ? मुंडे साहेब देखील तिथेच राहत होते. बाई आमच्या घरातील सर्वात जेष्ठ सदस्य आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करणे बरोबर नाही, असे म्हणत अजय मुंडे यांनी सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत? हे माहित आहे. सुरेश धस यांना खोक्या प्रकरणात सह आरोपी केले पाहिजे,अशी मागणीही अजय मुंडे यांनी काल केली होती.

विधीमंडळात आज अजय मुंडे यांनी केलेल्या आरोपा संदर्भात सुरेश धस (Suresh Dhas) यांना विचारले तेव्हा अजय मुंडे लहान आहे, त्याला काही माहित नाही, कळतं नाही. त्यामुळे त्याच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांना पुढे करून आरोप करू नयेत. थेट समोर येऊन बोलावे, मग मी खोक्या, बोक्या, आका अशा सगळ्या आरोपांना उत्तर देईन, असे आव्हान दिले. सुरेश धस धुतल्या तांदळासारखे नाहीत, खोक्याचे आका तेच आहेत, असा आरोप अजय मुंडे यांनी काल केला होता.

Suresh Dhas-Ajay Munde-Dhananjay Munde News
Suresh Dhas News : परळी नगरपरिषदेकडे मी अजून वळलेलो नाही, तिथे सगळ्यात मोठा घोळ! सुरेश धस थांबेनात..

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि आरोपींनी किती अमानवी पद्धतीने देशमुख यांचा खून केला हे समोर आले. याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्याने अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. मंत्री पद गेल्यानंतर धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर पलटवार करण्यास सुरुवात केल्याची चर्चा बीड जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. चुलत बंधू अजय मुंडे यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यात त्यांनी सुरेश धस यांच्यावर केलेले आरोप हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते.

Suresh Dhas-Ajay Munde-Dhananjay Munde News
Dhananjay Munde News : मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा ‘प्लॅन’ ठरला? कुणीच सुटणार नाही?

दरम्यान, अजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना सुरेश धस यांनी उत्तर देणे टाळले. अजय हा लहान आहे, त्याला काही माहिती नाही. धनंजय मुंडेंनी त्यांना पुढे करून आरोप करू नयेत. स्वतः पुढे येऊन बोलावे, मग मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन, असा पावित्रा धस यांनी घेतला. दरम्यान, सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक झाली, त्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्याच्याकडून आता जी माहिती बाहेर येईल, खोक्या, बोक्या, आका त्या सगळ्यांना उचलून आतमध्ये टाका, असेही धस म्हणाले.

Suresh Dhas-Ajay Munde-Dhananjay Munde News
Satish Bhosale arrested : 'खोक्या'ला मदत करणारे सहआरोपी होणार; पोलिस अधीक्षक नवनीत कावतांनी उचललं मोठं पाऊल

कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल.मीच म्हंटलं होतं ना कारवाई करा. त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याच्यावर जी कलमं लागली आहे त्याद्वारे कारवाई होईल, असे धस यांनी म्हटले आहे. दरम्यान, धस यांच्याविरोधात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या दोन बहिण भावांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. पंकजा मुंडे यांनीही आमदार सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com