Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिनाभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. तरी या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड मोक्काचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता या प्रकरणी दिवसांगणीस मोठे खुलासे होता आहेत. तयामुळे वातावरण तापले असतानाच शनिवारी या प्रकरणात नवी अपडेट समोर येत आहे. त्यातच शनिवारी दुपारी मस्साजोगमध्ये जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिनाभरापेक्षा अधिक काळ झाला आहे. तपास यंत्रणेकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे मस्साजोगमध्ये जाऊन मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मामी सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
या भेटीनंतर त्या भावुक झाल्या होत्या. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी मला त्यांच्याकडून पाहून माझे जुने 16 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. हे ग्रामीण भागात राहत असेल तरी त्यांचे आणि माझ दुःख एकच आहे. मी एकटी लढाई लढले आणि त्यांच्यासोबत त्यांचे गाव आहे, हाच काय तो फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सारंगी महाजन म्हणाल्या, गेल्या 11 वर्षांपासून मी समाजासोबत काम करत आहे. ग्रामीण भागातील गरिबाचं काय दु:ख असतं हे मला माहीत आहे. माझं दु:ख ही यापेक्षा वेगळं नाही. फरक एवढाच आहे की मी माझं दु:ख मागे टाकून मुलांना चांगलं शिक्षण दिले. आज यांचे लहान लेकरं बघून मला खूप वाईट वाटते. येत्या काळात त्यांच्यासाठी मला काही करता आलं तर मी नक्की करणार आहे. माझी जमीन आंबेजोगाईला आहे, त्याची न्यायालयीन लढाई लढत आहे. त्या जमिनीतून मला त्यांना काही देता आले तर मी त्यांना नक्की मदत करणार आहे.
बीडचे नाव बिहारसारखे खराब होतेय
यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्यावर टीका केली. हे दोघेही बहीण भाऊ येथे येत नाहीत, यातच समजून जा यांचे किती हात बरबाटले आहेत, असा आरोप यावेळी सारंगी महाजन यांनी केला. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, माझ्या केसमध्ये गोविंद बालाजी मुंडे त्याचे ते टोळभैरव त्याच्यासोबत वाल्मिक कराड याचे कनेक्शन आहे. वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय मुंडेंसोबत म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये मिक्स आहेत. या सर्व मंडळींमुळे बीडचे नाव बिहारसारखे खराब करू लागले आहेत, असा आरोप महाजन यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.