Dhananjay Munde sarkarnama
मराठवाडा

Dhanjay Munde : 'तुमचे राष्ट्रीय नेते अद्याप अविवाहितच'; धनंजय मुंडेंची आघाडीच्या उमेदवारावर खोचक टीका

Political News : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Beed news : राज्यात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानाला आता काही दिवसांचा अवधी उरला असल्याने प्रचाराला वेग आला आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यातच परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मला आमदार केलं तर सर्व मुलांचं लग्न लावून देतो, असे आश्वासन दिले होते. देशमुखांच्या या आश्वासनावर त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांनी लगेचच टीका करीत पलटवार केला आहे.

परळीतील आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यावर टीका करताना धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी नाव न घेता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला. राजेसाहेब देशमुख यापूर्वी काँग्रेस (Congress) पक्षात होते. त्या पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी अद्याप अविवाहित आहेत, हा धागा पकडत मुंडे यांनी देशमुख यांच्या वक्तव्याला उत्तर देताना टीका केली.

आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान घाटनांदुर येथे बोलताना आमदार झालो तर अविवाहित तरुणांचं लग्न लावून देण्याचं आश्वासन दिले होते. परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून येत असतांना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुम्हाला कुठून येणार? एकही उद्योगधंदा उभा केला नाही, त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे.

मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करु, सगळ्या पोरांना कामधंदा देऊ, असे राजेसाहेब देशमुख म्हणाले. देशमुख यांच्या या आश्वासनाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

या वक्तव्याचा समाचार घेताना धनंजय मुंडे म्हणाले, 'प्रचारावेळी कुठंतरी भाषण करताना ते म्हणाले सगळ्या मुलांचे लग्न लावून देऊ. ही निवडणूक लग्नासाठी चाललीय का? ते ज्या पक्षात होते तिकडून इकडं आले आहेत त्यांच्या पक्षाचे जे राष्ट्रीय नेते होते त्यांनी आणखी लग्न झाले नाही. ते आता इकडे येऊन सर्वांचं लग्न लावून देणार असे म्हणत आहेत. हे निवडणुकांचे मुद्दे आहेत का ? याचा विचार करा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT