MVA News : पुण्यातील बंडोबांचा थंडोबा करण्यात महाविकास आघाडी अपयशी

Assembly Election MVA Congress : उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बंडखोरांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले आहे.
nana Patole aba bagul Kamal Vyavahare ramesh chennithala
nana Patole aba bagul Kamal Vyavahare ramesh chennithalasarkarnma
Published on
Updated on

Pune News : महायुतीला एकीकडे पुणे शहरातील बंडखोरी रोखण्यात यश मिळाले असताना दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र बंडोबांना थंड करणार अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कसबा,पर्वती आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बंडखोरांनी अर्ज कायम ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या माजी महापौर कमल व्यवहारे आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते.

उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बंडखोरांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही प्रमाणात यश आले असून कसबा विधानसभा मतदारसंघातून मुख्तार शेख यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.

nana Patole aba bagul Kamal Vyavahare ramesh chennithala
Sada Sarvankar : राज ठाकरेंनी भेट नाकारली, सदा सरवणकरांची माघार नाहीच; माहीममध्ये तिरंगी लढत

कमल व्यवहारे या फोन बंद ठेवल्याने महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यापर्यंत आज पोचू शकले नाहीत. त्यामुळे शेवटच्या दिवशी देखील अर्ज माघारी न घेतल्याने त्या अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित झाला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी फोनद्वारे त्यांचे बोलणेही करून दिले असल्याचं सांगण्यात येत आहे. तरी देखील आबा बागुल हे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

पर्वती, शिवाजीनगर बंडखोरी कायम

पर्वती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार सचिन तावरे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील तावरे हे लढण्यावरती ठाम राहिले आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर मनीषा आनंद यांनी देखील उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ते देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असतील एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुण्यातील बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

nana Patole aba bagul Kamal Vyavahare ramesh chennithala
Congress News: मेळाव्याला 150 लोक आणि माघारीसाठी समजूत काढायला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com