Dhananjay Munde-Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde And Ajit Pawar: राजीनामा सोडाच... मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांचा 'तो' आदेशही धुडकावला..?

NCP Ajit Pawar Politics : मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच आता एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यात धनंजय मुंडेंनी थेट उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांचाच आदेश धुडकावल्याची चर्चा मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

Deepak Kulkarni

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात गंभीर आरोप होत असल्यानं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी खात्यातल्या भ्रष्टाचारावरुन त्यांना घेरण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच आता एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यात धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) थेट उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांचाच आदेश धुडकावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महायुतीत पुन्हा एकदा सत्तेत परतल्यानंतर आता भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे.यामुळेच तीनही पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता एकीकडे महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येत असतानाच आता दुसरीकडे अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री व आमदारांना कामाला लावतानाच जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नियोजनही ठरले होते. याकडे मंत्री धनंजय मुंडेंनी एकदाही जनता दरबार न घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या धडाकेबाज निर्णय आणि कामाच्या झपाट्यासाठी ओळखले जातात. ते कधी कधी भल्यापहाटेही एखाद्या विकासकामांना भेट देतात किंवा अधिकार्यांच्या बैठका घेतात, तसेच शासकीय, राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यांची आणखी एक विशेष बाब म्हणजे ते आपल्या बारामती मतदारसंघात न चुकता जनता दरबार घेतात. हाच जनता दरबाराचा पॅटर्न त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही लागू केला आहे. त्याप्रमाणे पक्षातील इतर नेत्यांना आणि मंत्र्याना आदेशही देण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्‍यांना आठवड्यातील दर मंगळवार,बुधवार आणि गुरुवारी जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम सुरू करण्यास सांगितले होते. मात्र,मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशालाच कात्रजचा घाट दाखवल्याचे दिसून येत आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित पवारांनी पक्षातील मंत्री आणि नेत्यांना महत्त्वाचे आदेश देतानाच आपापल्या मतदारसंघातील नागरिकांच्या नियमितपणे प्रश्न ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादीत जनता दरबार पॅटर्न सुरू केला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 7 जानेवारीपासून मंत्र्यांच्या पक्षकार्यालयात जनता दरबार घेण्यास सुरुवात झाली आहे.

पण हा उपक्रम सुरु होऊन आत्तापर्यंत 6 आठवडे उलटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर सगळे मंत्री यांच्याकडून अजित पवारांच्या आदेशाचे अगदी काटेकोरपध्दतीनं पालन केले जात असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी अद्याप एकही जनता दरबाराला उपस्थिती लावलेली नाही.त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशालाच झुगारल्याची की काय अशी विचारणा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातही मंत्री हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे,मकरंद पाटील, दिलीप वळसे पाटील,नरहरी झिरवाळ,आदिती तटकरे,नरहरी झिरवाळ,धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या प्रमुख नेत्यांसह इतर नेतेमंडळींवर मंगळवार,बुधवार,गुरुवारी जनता दरबार घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT