NCP leaders U-turn : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा 48 तासांतच यू टर्न? 'या' नेत्यावर केले गंभीर आरोप

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या आव्हाडांच्या विश्वासू नेत्यांनी शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली आहे. दोन दिवसापूर्वी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता.
Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाविकास आघाडीतून मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहिल्या तर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे जाणाऱ्या नेतेमंडळीचा ओघ वाढला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या आव्हाडांच्या विश्वासू नेत्यांनी शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली आहे. दोन दिवसापूर्वी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. अभिजीत पवार हे दोनच दिवसांमध्ये शरद पवारांकडे परतले आहेत.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Dharashiv Shivsena : धाराशिवमध्ये पाऊल ठेवताच पालकमंत्री सरनाईकांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोनवेळा जाळ्यात अडकलेला वाघ..'

अभिजीत पवार यांच्यासह हेमंत वाणी यांनी देखील अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा एकदा अभिजीत पवार यांची घरवापसी झाली आहे. अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आपल्यावर दबाव होता असा गौप्यस्फोट अभिजित पवार यांनी केला आहे.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Uddhav Thackeray : पक्षातील नेत्यांवर टीका करणे भोवले; 'या' प्रवक्त्याला उद्धव ठाकरेंनी दाखवला घरचा रस्ता

अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जातात. आव्हाडांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता, मात्र त्यानंतर आता ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात परतले आहेत.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Chhagan Bhujbal News : शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा कमी केली?, भुजबळांचं काय आहे म्हणणं?

राष्ट्रवादी अजित पवार गटात अभिजीत पवार यांनी हेमंत वाणी यांच्यासह प्रवेश केला होता. त्यांच्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी दबाव होता असा आरोप त्यांनी केला आहे. नजीम मुल्ला यांनी पक्षप्रवेशासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग केले, पण त्या ब्लॅकमेलिंगला मी आता बळी पडणार नाही. माझी एवढीच चूक झाली की मी साहेबांशी बोलायला हवे होते, पण मी तणावात होतो. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला, असे अभिजीत पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर अभिजीत पवार यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात घरवापसी केली आहे.

Jitendra Awhad, Sharad Pawar, Ajit Pawar
Delhi BJP Strategy : दिल्लीत राजस्थानप्रमाणे भाजपचे धक्कातंत्र; आणखी दोन वेगळ्या पॅटर्नची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com