Ashok Chavan, Dhananjay Munde, Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde Beed : धनंजय मुंडेंचा अशोक चव्हाण, अमित देशमुखांना झटका; 'या' प्रकल्पांवर मारला डल्ला

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच राज्य मंत्रिमंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाडा विभागाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आले आहेत. मात्र, या सर्व घाईगडबडीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एकेकाळी महाविकास आघाडीतील सहकारी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री अमित देशमुखांना जोर का झटका दिला आहे. मुंडेंनी चव्हाण आणि देशमुखांच्या जिल्ह्यातील प्रत्येकी एक-एक प्रकल्पावर डल्ला मारला. यावर चव्हाण आणि देशमुख काय आणि कसे उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. (Latest Political News)

नांदेड जिल्ह्यातील कंधारी लाल गाईचा प्रकल्प, तर लातूर जिल्ह्यातील सोयाबीन निर्मितीचा प्रकल्प बीड जिल्ह्यात नेण्यात आला आहे. विशेषतः या दोन्ही प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नांदेडमध्ये होणारा कंधारी लाल गाईचा प्रकल्प, तर लातूर जिल्ह्यातील सोयाबीन निर्मितीचा प्रकल्प बीड जिल्ह्यात उभारला जाणार आहे. (Maharashtra Political News)

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात या गायी सर्वाधिक आढळत होत्या. परंतु गेल्या काही वर्षांपासून या गायींची संख्या या भागातून कमी होत आहे. या गाईच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून नांदेड जिल्ह्यात एक प्रकल्प उभारला जणार होता, तर मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग प्रकल्प लातूर जिल्ह्यात उभारण्यात येणार होता.

हे दोन्ही प्रकल्प महाविकास आघाडीतील सरकारच्या काळात आपल्याच जिल्ह्यांना मिळावेत, यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री अमित देशमुख यांनी प्रयत्न केले होते. त्याशिवाय त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेतला होता. मात्र, सरकार बदलल्यानंतर त्यावर कुरघोडी करीत हे दोन्ही प्रकल्प धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात आणून त्या दोघांवर मात केली आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकारामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत घमासान होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT