Dhananjay Munde Latest News
Dhananjay Munde Latest News  sarkarnama
मराठवाडा

धंनजय मुंडेंचा मोठा निर्णय : ओबीसींना देणार 27 टक्के आरक्षण

सरकारनामा ब्यूरो

Dhananjay Munde : राज्यातील 92 नगर परिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) राज्य निवडणुका आयोगाने (Election Commission) घोषित केल्या असल्याने या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होत असल्या तरी राजकीय आरक्षणाचा निर्णय जो काही येईल तो येईल, मात्र आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना 27 टक्के जागा देणार असल्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जाहीर केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ मार्गी लावावा व त्यानंतरच राज्यात निवडणुका घ्याव्यात अशी भूमिका मुंडे यांनी व्यक्त केली होती. मात्र राजकीय प्रवाहात ओबीसींचे स्थानिक इच्छुक उमेदवार यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा विचार करून, आरक्षणाचा निकाल जो येईल व जेव्हा येईल तेव्हा बघून घेऊ पण आम्ही परळी नगर परिषद निवडणुकीत 27 टक्के जागा ओबीसी उमेदवारांना देणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे.

मुंडे हे परळीचे आमदार असून परळी नगर परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परळीत ३२ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT