'शिवसेनेला अजिबात धक्का लागलेला नाही'

Sanjay Raut Shivsena|Uddhav Thackeray : 'मातोश्री' आमच्यासाठी आई आहे,असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut Latest Marathi News,
Sanjay Raut Latest Marathi News, Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut : सत्ता असो किंवा नसो शिवसेनेला काही फरक पडत नाही. शिवसेना (Shivsena) आहे तिथेच आहे. शिवसेनेला अजिबात धक्का लागलेला नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. उद्या (ता.11 जुलै) लोकशाही शिल्लक आहे का ते कळेल, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले आहे.

आज (ता.१० जुलै) 'मातोश्री'वर(Matoshri) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला राऊत उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (sanjay raut Latest Marathi News)

Sanjay Raut Latest Marathi News,
शिंदे सरकार असंवेदनशील; विमानाने फिरतयं अन् अडीच हजारांची दाढी करतयं!

राऊत म्हणाले, आमच्या मातोश्रीवर बैठका सुरू आहेत. प्रत्येक शिवसैनिक येत आहे. उद्धव ठाकरे त्यांना भेटत आहे. आता ठाकरे काय करणार? ते पुन्हा शिवसेनेला कसे एकत्र करणार?, असे सवाल उपस्थित होत आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही नेहमीसाठी मातोश्री'सोबत आहोत. मातोश्री आमच्यासाठी आई आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आई आहे. आम्ही आमचे मातोश्रीसोबत असलेले संबंध तोडणार नाही. आमचे संबंध कोणी तोडूही शकत नाही, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut Latest Marathi News,
एकनाथ शिंदे गटातील निवडक बंडखोरांसाठी आदित्य ठाकरेंचा मोठा मेसेज

दरम्यान, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) वगळता शिंदे गट व शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून सोमवारी दोन्ही गटांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था वेगवेगळ्या आहे की याबाबत उद्या कळेल. कायद्याची पायमल्ली सुरू असून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या लोकशाही जिवंत आहे की नाही हे कळेल. पण आम्हला विश्वास आहे की न्याय होईल,अशा शब्दात राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com