Chandrkant Patil -Dhananjay Munde
Chandrkant Patil -Dhananjay Munde 
मराठवाडा

धनंजय मुंडेंचा पलटवार... ' चंद्रकांत पाटील मर्यादा ठेवून बोला'

सरकारनामा ब्युरो

बीड : “वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपाचा (BJP) तर नक्कीच नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहूदे. पण आज राज्यातील सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे. अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा समाज हा नेहमीच त्याच्या पाठीशी उभा राहतो, हे नवाब मलिकांनी ध्यानात ठेवावं, अस वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यावेळी नवाब मलिक रोज भाजपावर टीका करतात असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'असे लोक मी खिशात ठेवतो' अशी खोचक टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केली होती. पुणे जिल्ह्यातील तळेगांवमध्ये माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टीकास्त्र डागले होते.

या वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पलटवार केला आहे. '' चंद्रकांत पाटलांचे किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेऊन बोलायला पाहिजे. तुम्ही याठिकाणी कुणाला खिश्यात ठेवतो, कुणाला वाचपाकिटामध्ये ठेवतो, ही भाषा चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या सारख्या भारतीय जनता पार्टीच्या राज्य अध्यक्षाला शोभणारे नाही', असे म्हणत धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावले आहे.

दरम्यान, शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी पुन्हा भाजपवर आरोप केले होते. भाजपचे बडे नेते, त्यांच्याजवळची लोकं एनसीबीच्या कार्यालयात जात असून एनसीबी अधिकाऱ्यांना भेटत आहेत. काही भाजपाचे नेत्यांचे राईट हँड समीर वानखेडेंना भेटत आहेत, हे मी जबाबदारीने सांगतोय. या हालचाली वाढल्या आहेत. पोपट पिंजऱ्यात गेला तर आणखी अनेक गुपितं बाहेर येतील म्हणून जीन असलेले भाजपाचे लोक घाबरायला लागला आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठमोठे नावं समोर येणार असल्याचं मलिकांनी म्हंटल होत. तसेच, के. आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी, भाजपचा एक नेता आणि त्याची पत्नी एका खासगी कंपनीत संचालक आहेत. असा गौप्यस्फोटही यावेळी मलिकांनी केला होता. इतकेच नव्हे तर हिवाळी अधिवेशनात विधानभवनाच्या पटलावर मी हे सर्व मांडणार आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT