Cm Eknath shinde  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला धक्का; शक्तिप्रदर्शन करीत तालुकाप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश

Political News : पालकमंत्री सावंत यांनी धाराशिव विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासोबतच संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

दिलीप गंभिरे

Dharashiv News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश आले नाही. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले. धाराशिव लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना पसंती देत लोकसभेत पाठविले.

महायुतीला लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसल्याने महायुतीच्या त्यात शिंदे यांच्या शिवसेनेचे पालकमंत्री सावंत यांनी धाराशिव विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासोबतच संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी 100 गाड्यांच्या ताफ्यासह कळंब ते परंडा रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शिवाजी कापसे यांनी यापूर्वी स्वतः मित्रमंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पोहचले. त्यानंतर काँग्रेस पक्षांमध्ये काम केले होते. त्यानंतर ठाकरे गटात प्रवेश केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी कापसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालकमंत्री तानाजी सावंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला

पक्ष प्रवेशाची चर्चा रंगली

गेल्या काही दिवसांपासून कापसे यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. पालकमंत्री सावंत यांनी पुण्यात एक बैठक घेतली होती. यावेळी आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याचे कापसे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT