Mahayuti News : हडपसर मतदारसंघावरून सस्पेन्स कायम; तुपेंना धाकधूक तर भानगिरे यांच्या आशा पल्लवीत

Political News : महायुती, महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता हडपसर मतदारसंघावरून महायुतीमध्ये सस्पेन्स कायम आहे.
Chetan Tupe, Nana Bhangire
Chetan Tupe, Nana BhangireSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. महायुती, महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता हडपसर मतदारसंघावरून महायुतीमध्ये सस्पेन्स कायम आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 25 उमेदवारांची नावे फायनल करण्यात आल्या बाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या 25 जणांमध्ये पुणे शहरातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव आहे. मात्र, हडपसर येथील अजित पवार यांच्यासोबत असलेले चेतन तुपे (Chetan Tupe) यांचं नाव मात्र त्यामध्ये नाही. त्यामुळे चेतन तुपे यांचा उमेदवारीतून पत्ता कट होणार का? अशा चर्चा सध्या सुरू आहेत. त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या आशा मात्र पल्लवीत झाल्या आहेत. (Mahayuti News)

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली असून त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या बातम्या समोर आल्या. ते संभावित 25 उमेदवार कोण असतील हे देखील त्यांच्या मतदारसंघासह समोर आले आहे.

त्यांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघांमधूनच लढणार हे समोर आले आहे. या 25 उमेदवारांची नावे समोर आल्यानंतर भाजपने यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया देणं देखील टाळलं आहे.

Chetan Tupe, Nana Bhangire
Arvind Kejariwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

या जाहीर करण्यात आलेल्या 25 उमेदवारांच्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील काही उमेदवारांची नाव आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार, खेडमधून दिलीप मोहिते पाटील, इंदापूरमधून दत्ता भरणे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, मावळमधून सुनील शेळके आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमधून सुनील टिंगरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

पुणे शहराचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे सध्या पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या विधानसभा मतदारसंघांमधील एका आमदारच नाव या यादीमध्ये समोर आलं असलं तरी दुसरे आमदार म्हणजेच चेतन तुपे पाटील यांचे नाव मात्र या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा चर्चा रंगल्या आहेत.

Chetan Tupe, Nana Bhangire
Sanjay Raut Vs Chhagan Bhujbal : 'हनुमान चालीसा'चा आवाज..; राऊतांनी भुजबळांना सुनावलं, तर राणांना खोचक टोला

या मतदारसंघात चेतन तुपे पाटील यांच्यापेक्षा वेगळा कोणता उमेदवार देण्याचा व विचारात अजित पवार आहेत का ? यासोबतच महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्याच्या विचारात अजित पवार आहेत का ? अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार सुनील टिंगरे यांचे नाव कल्याणीनगर येथील पोर्षे अपघात प्रकरणांमध्ये चर्चेत राहिले. या मुळे त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, आता अजित पवारांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समोर आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर चेतन तुपे यांची भूमिका फारकाळ गुलदस्त्यात होती. चेतन तुपे हे कधी शरद पवार गटाच्या व्यासपीठावर तर कधी अजित पवार गटाच्या व्यासपीठावर दिसत होते.

लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी अजित पवारांसोबत राहणं पसंद केले. त्याच प्रकारची आता संभ्रम अवस्था त्यांच्या उमेदवारीबाबत देखील दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून या विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले योगेश टिळेकर यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकी दिली आहे. मुळे या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे, असे नाना भानगिऱ्यांना वाटत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Chetan Tupe, Nana Bhangire
Solapur News : ‘जरांगेंना शह देण्यासाठीच फडणवीसांची सुपारी घेऊन राजेंद्र राऊतांचे बार्शीत आंदोलन’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com