eknath shinde, om rajenimbalkar  Sarkarnama
मराठवाडा

Dharshiv Politcs : सहा जीव गमावल्यानंतर धाराशिव नगरपरिषदेला तीन अग्निशमन वाहने मिळणार; ओम राजेनिंबाळकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंकडे घातले होते साकडे

Dharashiv Municipal Council News : नगरविकास विभागाने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेसाठी तीन नवीन अग्निशमन वाहनांच्या खरेदीस विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.

Jagdish Pansare

Dharashiv News : धाराशीव जिल्ह्यातील येडशी येथे ऐन दिवाळीत दुकान आणि घराला आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण मराठवाडा हळहळला होता. नगरपरिषदेकडे अत्याधुनिक अग्निशमन वाहने, यंत्रसामुग्री, सरक्षा उपाय उपलब्ध असते तर या कुटुंबाचे प्राण वाचले असते, असा सूर या दुर्घटनेनंतर निघाला होता. शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती देताना सुसज्ज अशा अग्निशमन वाहने व इतर यंत्रसामुग्री देण्यासंदर्भात फोनवरून मागणी केली होती.

यावर नगरपरिषदेचा प्रस्ताव पाठवा, तात्काळ वाहने देण्याची व्यवस्था करतो, असा शब्द शिंदे यांनी दिला होता. अखेर धाराशिव नगरपरिषदेसाठी तीन अग्निशमन दलाच्या गाड्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेसाठी तीन नवीन अग्निशमन वाहनांच्या खरेदीस विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. यासाठी ४ कोटी ५० लाख ९० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

धाराशिव नगरपरिषदेकडे स्वतःची अग्निशमन दलाची गाडी नसल्याने शहराच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच येडशी येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन यंत्रणेची गरज अधिक प्रकर्षाने समोर आली. ही बाब गांभीर्याने घेत खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी धाराशिव नगरपरिषदेसाठी चार नवीन अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती.या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

धाराशिव शहरात आग लागण्याची घटना घडल्यास अन्य ठिकाणांहून अग्निशमन वाहनांची मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता होती. येडशी येथील आगीच्या दुर्घटनेनंतर ही उणीव प्रकर्षाने समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर ओम राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी स्वतंत्र अग्निशमन वाहनांची मागणी लावून धरली होती.

येडशी दुर्घटनेने धाराशिव जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणेची मर्यादा आणि ग्रामीण भागातील आपत्कालीन सुविधांची कमतरता प्रकर्षाने समोर आणली होती. त्यामुळे या निर्णयाकडे केवळ वाहन खरेदी म्हणून नव्हे, तर भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशमन धोरण तयार करण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT