Bjp Politician: भाजप नेत्याचा थाटच नादखुळा! स्वतः च्या प्रायव्हेट जेटनं 'हा' बडा नेता मतदारसंघात मारतो फेरफटका; घराजवळच आहेत दोन हेलिपॅड

Private jet politician India News : हे नेते त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी हेलिकॉप्टरचाच वापर करतात. तर त्यांच्या घराजवळच दोन हॅलीपॅड आहेत.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : भारतात अनेक उद्योजक व मोजक्याच सेलिब्रिटींकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट आहेत. भारतात अनेक श्रीमंत राजकीय नेतेमंडळी आहेत. मात्र, स्वत:च्या मालकीचे प्रायव्हेट विमान आणि हेलीकॉप्टर असलेल्या भाजपमधील एका बड्या नेत्याच्या नावाची चर्चा मात्र जोरात आहे. खासदार असलेले हे नेते त्यांच्या मतदारसंघात फिरण्यासाठी हेलिकॉप्टरचाच वापर करतात. तर त्यांच्या घराजवळच दोन हॅलीपॅड आहेत. असा हा भाजपचा बडा नेता कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागली असेल.

भारतात अनेक बडे राजकीय नेते आहेत. मात्र स्वत:च्या मालकीचे प्रायव्हेट विमान आणि हेलीकॉप्टर असलेले खूप कमी नेते आहेत. स्वत:च्या मालकीचे प्रायव्हेट विमान आणि हेलीकॉप्टर असलेल्या या राजकीय नेत्याचे नाव आहे ब्रिजभूषण शरण सिंग. ब्रिजभूषण हे भाजपचे नेते असून ते खासदार देखील होते. प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जातात. ते एकूण सहा वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी गोंडा, बलरामपूर आणि कैसरगंज या तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून विजय मिळवला आहे.

BJP Flag
Ajit Pawar Death: अजितदादांची अखेरची आठवण! बारामतीत सुनेनं काढलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) त्यांना तिकीट नाकारले होते, मात्र त्यांच्या जागी त्यांचे छोटे चिरंजीव करण भूषण सिंग हे कैसरगंजमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा प्रतीक भूषण सिंग हे गोंडा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

BJP Flag
Ajit Pawar tribute : निवडणूक संपल्यावर तुझ्याकडे जेवायला येईन, पण घरी आला अस्थिकलश! अजित पवारांचा आमदार भावूक

ब्रिजभूषण (Brij bhushn Singh) यांनी 1988 मध्ये राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भाजप आणि समाजवादी पक्ष अशा दोन्ही पक्षांत काम केले आहे, परंतु त्यांची मुख्य ओळख भाजप नेते म्हणून आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार आहेत. कुबेराला लाजवेल इतकी अफाट संपत्ती ब्रिजभूषण यांच्याकडे आहे.

BJP Flag
Ajit Pawar Flexes Removed : दुःखावर मीठ चोळले, अजित पवारांचे फ्लेक्स हटवले, व्हिडिओ व्हायरल; पुतण्या रोहित पवार प्रचंड संतापले

ब्रिजभूषण यांचे निवासस्थान 15 एकरांवर परिसरावर आहे. त्यांनी या ठिकाणी एक मोठा महलच उभारलेला आहे. त्यांच्याकडे गोंडा येथील घराव्यतिरिक्त लखनऊमध्ये बरीच जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. ब्रिजभूषण सिंग हे 40,185,787 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या पत्नीकडे 63,444,541 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

BJP Flag
Ajit Pawar Flexes Removed : दुःखावर मीठ चोळले, अजित पवारांचे फ्लेक्स हटवले, व्हिडिओ व्हायरल; पुतण्या रोहित पवार प्रचंड संतापले

ब्रिजभूषण यांनी काही दिवसासापूर्वी भगव्या रंगाचे हेलिकॉप्टर घेतले आहे. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या घराजवळच दोन हॅलीपॅड आहेत. ते आपल्या मतदारसंघात हेलिकॉप्टरनेच फिरतात. त्यामुळे त्यांच्या या प्रचारासाठी भाड्याने हेलिकॉप्टर घेणारे अनेकजण आपण पाहिले असतील, पण त्यांच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर असल्याने या नेत्याचा रुबाब पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो.

BJP Flag
BJP Defeated : भाजपचा सपाटून पराभव, महापौरपदी अजीव पाटील; उपमहापौरपदी लोपीस; ठाकूरांचे सोशल इंजिनिअरिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com