Love affair suicide case Sarkarnama
मराठवाडा

Love affair suicide case : कला केंद्रावरील नृत्यांगणासोबत प्रेमसंबंध, वादाची ठिणगी अन् युवकानं क्षणात उचललं टोकाचं पाऊल!

Dharashiv Kalamb Suicide Case : FIR Registered Against Puja Waghmare by Yeramal Police : धाराशिवच्या साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या नृत्यांगणासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आणि वादातून युवकाने आत्महत्या केली.

Pradeep Pendhare

Dharashiv crime news : नृत्यांगणाच्या नादातून बीडच्या गेवराईचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्याचे प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणातील नृत्यांगणा पुजा गायकवाडविरोधात गुन्हा दाखल झाला.

हे प्रकरण शांत होत नाही तोच, आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथल्या साई कला केंद्रामधील नृत्यांगणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधानातून आणि त्यानंतर तिच्याशी झालेल्या वादातून 25 वर्षाच्या युवकाने गळफास घेतला. अश्रुबा अंकुश कांबळे, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, यात नृत्यांगणा पूजा वाघमारे ऊर्फ आरती हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा येरमाळ पोलिसांनी (Police) नोंदवत ताब्यात घेतलं आहे.

येरमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुई (ढोकी, ता. धाराशिव) इथल्या अश्रुबा अंकुश कांबळे आणि आळणी फाटा इथल्या साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या लातूर (Latur) इथली पुजा वाघमारे ऊर्फ आरतीबरोबर पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सोमवारी (ता. 8) ते दोघेही शिखर शिंगणापूर इथं देवदर्शनाला होते.

तेथून परतताना अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. फोन आल्याचे निमित्तानं अश्रुबा आणि त्याच्यासोबत असलेली प्रेयसी नृत्यांगणा पुजा यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्याकडे पुजाने दुर्लक्ष केले.

दरम्यान, अश्रुबाने चोराखळी इथल्या जंगलातील एका झाडाला गळफास घेतला. काही शेतकऱ्यांना मंगळवारी (ता.9) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. येरमाळा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी केली. दरम्यान, या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात संबंधित पुजाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

येरमाळ पोलिसांकडून तपास सुरू

येरमाळ पोलिसांनी नृत्यांगणा पुजा हिला ताब्यात घेतलं आहे. पुजाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 108 बीएमएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आता सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुजाच्या आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे तपास करीत आहेत.

उपसरपंच बर्गे आत्महत्याप्रकरण पुन्हा चर्चेत

दरम्यान, धाराशिवमधील या घटनेमुळे बीडमधील गेवराईच्या मसला खुर्द गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्याप्रकरणाची घटना चर्चेत आली. नृत्यांगणा पुजा हिच्या अपेक्षा पूर्ण करताना, शेवटी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा देखील झालेला आहे. हे प्रकरण राज्यात गाजले. यानंतर बीड जिल्हा प्रशासनाने चोराखळी, आळणी फाट्यावरील पाच कला केंद्र जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाने बंद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT