

Shivsena News : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक झाल्याने सत्ताधारी विशेषतः शिवसेनेचे मंत्री प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना टार्गेट करत शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांनी आदित्य यांना विरोधी पक्षनेते पदाचा मोह होतोय, असा टोला लगावला आहे.
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर लगेच महायुती सरकारने नागपूरात एका आठवड्याचे हिवाळी अधिवेशन भरवले. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह विरोधकांनी केली. यावर फडणवीसांनी कोरोना काळात इतर राज्यात महिना महिना अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रात तीन आणि चार दिवसांची अधिवेशनं झालीच की, म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या काळाची आठवण करून दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिंदेंच्या शिवसेनेचे बावीस आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचा दावा करत आदित्य ठाकरेंनी खळबळ उडवून दिली. याला काऊंटर करण्यासाठी मग एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) मैदानात उतरले.
आदित्य ठाकरे यांचा दावा खोडून काढताना, उबाठाचेच आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यांची नावेही मी सांगू शकतो, पण योग्यवेळी सांगेन. एकनाथ शिंदेंनी हिरवा कंदील दाखवला की ते सगळे आमच्याकडे येतील आणि उबाठा पक्ष रिकामा होईल, असा पलटवार केला.
एवढ्यावरच न थांबता 2019 मध्ये राज्यात जेव्हा शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला होता. उद्धव ठाकरेंनीही मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे जाहीर केले होते. पण रात्रीतून चमत्कार घडला आणि ते स्वत:च मुख्यमंत्री झाले.
उद्धव ठाकरे यांना त्यावेळी जसा मुख्यमंत्री पदाचा मोह आवरता आला नाही, तसा आता आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पदाचा मोह आवरता येत नाहीये. त्यांना विरोधी पक्षनेता होण्याची घाई झाली आहे. त्यासाठी ते बैठका घेत असले तरी त्यांच ऐकत कोण? त्यांच्या पक्षाचे आमदार तरी त्यांचे ऐकतात का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.