Celebration by BJP-Mahayuti leaders after winning the Kalamb Panchayat Samiti chairman and deputy chairman posts in Dharashiv following a tie resolved through a lucky draw. Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv News: कळंब पंचायत समिती, सभापती-उपसभापती पद भाजपला, टाय सामन्यात महायुतीला 'ईश्वर चिठ्ठी'ची साथ!

Kalamb Panchayat Samiti Election : धाराशिव जिल्ह्यातील कळंब पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी समसमान ठरल्या. ईश्वर चिठ्ठीने भाजप उमेदवार विजयी झाले आणि महायुतीने पंचायत समितीवर सत्ता मिळवली.

Jagdish Pansare

Panchayat Samitee News : मराठवाड्यासह राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने चांगले यश मिळवले. सर्वाधिक जागा जिंकत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीने सत्तेचे गणित जुळवले. धाराशिव जिल्ह्यातील कळंब पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणुक चुरशीची झालेली पहायला मिळाली.

महायुती आणि महाविकास आघाडीकडे समसमान संख्याबळ असल्याने नियमानुसार ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. नशीबाने इथेही महायुतीची साथ दिली आणि भाजपाचा सभापती, उपसभापती विजयी झाला. तुळजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे विक्रमसिंह देशमुख (काटी) यांची तसेच उपसभापतीपदी रोहिणी विवेकानंद मेलगीरी (सिंदगाव) यांची निवड झाली. या ट्विस्टमुळे कळंब पंचायत समितीची निवडणूक लक्षवेधी ठरली. धाराशिव, कळंब आणि तुळजापूर शिवाय उमरगा, लोहारा पंचायत समितीतही महायुतीने बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवला.

धाराशिव जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या या यशाचे श्रेय आमदार राणाजगजीतसिंह पाटील याचे असल्याचा दावा केला जात आहे. धाराशिवसह तुळजापूर, कळंब पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. कळंब पंचायत समितीत ईश्वर चिठ्ठीने सभापती, उपसभापति विराजमान झाल्यानंतर तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.

हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देऊन तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राणा पाटील यांना घेरण्याचे विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर धाराशीवमध्ये महायुतीची ताकद वाढली आहे.

तर नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पदरात अपयश आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मात्र भाजपाचे यश हे पैशाच्या जोरावर मिळवलेले असल्याची टीका केली आहे.

नुकत्याच झालेल्या धाराशीव जिल्हा परिषदेत भाजपाने 19 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. तर शिंदेच्या शिवसेनेने 15 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली. उद्धव ठाकरेंची खासदार-आमदार जोडी मात्र या निवडणुकीत निष्प्रभ ठरली. या पक्षाला सात जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस तीन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा जागांवर विजय मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT