Vikram Kale  sarkarnama
मराठवाडा

Dharashiv lok sabha constituency : आमदारकीची हॅटट्रिक; आता विक्रम काळेंना खासदारकीचे वेध

Shital Waghmare

Dharashiv : देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. धाराशिव जिल्ह्यात महायुतीच्या गटात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनीही पक्षाने संधी दिली तर धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरेश बिराजदार यांनीही धाराशिव लोकसभेसाठी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे अजित पवार गटातसुद्धा धाराशिव लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावेदारांची संख्या वाढू लागली आहे.

विक्रम काळे (Vikram kale) यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी राणाजगजितसिंह पाटील (Ranajgajitsinh Patil ) यांना उमेदवारी दिली होती. मात्र आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. पक्षाने संधी दिल्यास धाराशिव लोकसभा (loksabha) मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्यास आपण तयार असल्याचे काळे यांनी सांगितले.

पळसप येथे 2 फेब्रुवारी रोजी मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनासंदर्भात त्यांनी आयोजिलेल्या पत्रकारपरिषदेत आमदार काळे बोलत होते. यावेळी माजी कुलगुरू प्रा. मधुकर गायकवाड, प्रा. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, बालाजी तांबे, राजकुमार मेंढे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यपातळीवर राज्यातील लोकसभा निवडणूक जागावाटपाबाबत महायुतीमध्ये चर्चेची पहिली फेरी संपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) राज्यात धाराशिवसह लोकसभेच्या 12 जागा मागितल्या आहेत. या निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून संधी दिल्यास निवडणुकीसाठी मीपण इच्छुक आहे, असे आमदार काळे म्हणाले.

ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद असेल त्या पक्षाला तेथील उमेदवारी देण्याचे फायनल झाले आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगली ताकद आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचे चिन्ह आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा या दोन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मला पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे स्पष्ट मत आमदार विक्रम काळे यांनी बोलताना सांगितले. 

उमेदवारीसाठी रस्सीखेच

धाराशिव लोकसभेसाठी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश नेते बसवराज मंगरुळे, भाजपचे माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर, महायुतीतील शिंदे गटातून उमरगा येथील माजी खासदार रवींद्र गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेणे सुरू केले आहे. तसेच एका माजी आयएएस अधिकाऱ्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी करीत असल्याची माहिती आहे. यात आता मराठवाडा शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे यांचीही भर पडली आहे.

(Edited By Roshan More)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT