Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Eknath Shinde sarkarnama
मराठवाडा

Shivsena Politics: 'एका जीवानं, ताकदीनं शिवसेना एकत्र झाली तर...'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या खासदाराचं मोठं विधान

Dharashiv News: काही महिन्यांपूर्वीच 'मातोश्री'शी एकनिष्ठ मानले जाणा उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केले आह.

Deepak Kulkarni

Mumbai News: एकीकडे ऐनदिवाळीत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात शरद पवार,पार्थ पवार, शशिकांत शिंदे,प्रुफुल पटेल या प्रमुख नेत्यांसह सुरु असलेल्या भेटीगाठी-बैठकांचा धडाका यामुळे मध्यंतरीच्या काळात पूर्णविरामापर्यंत पोहोचलेला विलिनीकरणाचा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याचदरम्यान,आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे.

धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी रविवारी(ता.8 नोव्हेंबर)माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावरही रोखठोक भाष्य केलं आहे. त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास महाराष्ट्रातील जनतेचं भलं होईल,असं त्यांनी म्हटलं आहे.

धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले,शिवसेना एकत्र येण्याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. मात्र,दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही अनेक कार्यकर्त्यांची आंतरिक भावना असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. तसेच विनाकारण कुणीही पक्ष सोडत नसतं अशी बोलकी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आम्हाला तर आनंदच आहे. उलट एका जीवानं, एका ताकदीनं शिवसेना एकत्र झाली तर मला वाटतं सामान्य माणसांचं त्यात भलंच होईल असा विश्वासही त्यांनी व्यत्त एकसंघ शिवसेना राज्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करेल आणि सामान्य जनतेच्या हितासाठी ते फायदेशीर ठरण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केल

काही महिन्यांपूर्वीच 'मातोश्री'शी एकनिष्ठ मानले जाणा उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंतर पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत मोठं विधान केले आह.

ते म्हणाले, “माणूस निर्णय घेतो तेव्हा काहीनाकाही घडले असते. वेगळा निर्णय स्वखुशीने कोणी घेत नाही. नगरपंचायत असेल, जिल्हापरिषद असेल, पंचायत समिती असेल. एकही नगपालिका येण्याईतके आमचे काम वाईट असेल का? एकही पंचायत समिती न येण्याईतके आमचे काम वाईट होते का? आम्ही रोज लोकांमध्ये आहे. माझ्यासारखं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनं याचा काय अर्थ काढायचा? अशी खंतही व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT