Dharashiv News: धाराशिवचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या काकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. ओमराजे निंबाळकरांचे (Omraje Nimbalkar) काका बाबा पाटील यांची इनोव्हा कारची पिकअपला धडकल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.
लातूर -उमरगा महामार्गावरील नारंगवाडी तलाव परिसराजवळ अपघाताची ही घटना शुक्रवारी (ता.7) घडली. या अपघातावेळी बाबा पाटील यांच्या कारच्या एअर बॅग उघडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मराठवाड्यातील विश्वासू शिलेदार अशी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची ओळख आहे. बाबा पाटील हे त्यांचे काका आहेत. या अपघातामध्ये पाटील यांच्या इनोव्हा कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पण पाटील हे सुदैवानं बचावल्यानं मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. या लोकसभा निवडणुकीवेळी धाराशिव मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे होते. तरीदेखील ओमराजे यांनी तब्बल तीन लाख 29 हजार 846 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा दारुण पराभव केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.